Girish Mahajan Sanjay Raut  Saam tv
महाराष्ट्र

Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंना आमंत्रण का नाही दिले; गिरीश महाजनांनी कारण सांगत साधला संजय राऊतांवर निशाणा

भूषण अहिरे

धुळे : महात्मा गांधींना काय उद्धव ठाकरे यांनी घडवलं की संजय राऊतांनी घडवलं. संजय राऊत यांना व्हरबल डायरीया झाला असल्यासारखं ते सकाळी उठून बडबड करीत असतात. राम मंदिराचा उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले नाही; यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांची बडबड सुरू होती. त्यांचा पक्ष त्यांचा राहिला आहे का? आठ- दहा आमदार त्यांच्याकडे उरले आहेत. अशा आठ- दहा आमदार असलेल्यांना तिथं बोलावलं तर तेथे जागाच उरणार नाही; म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केंद्र सरकारतर्फे आमंत्रण देण्यात आले नसल्याची मत व्यक्त करत संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर मंत्री गिरीश महाजन (GIrish Mahajan) यांनी निशाणा साधला आहे. (Tajya Batmya)

अयोध्येतील राम मंदीरच्या उदघाटन सोहळ्यासाठी आमंत्रण न दिल्यावरून (Dhule) संजय राऊत यांनी इतिहासाशी भाजपचा संबंध नसल्याचे वक्तव्य केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांनी निवडणूक लढवावी व जिंकून दाखवा 

वंचित बहुजन आघाडीच्या संभाजीनगर येथील बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या प्रत्येकी १२ जागा वाटपा संदर्भात सुरू असलेल्या चर्चावरून मंत्री गिरीश महाजन यांनी या चारही पक्षांना माझ्या शुभेच्छा असून त्यांनी त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्मुला तयार करून निवडणूक लढवावी व जिंकून दाखवावी असे म्हणत विरोधकांच्या सुरू असलेल्या बैठकांवर निशाणा साधला आहे.


जागा वाटपाचा निर्णय दिल्लीतील हायकमांड घेतील 
धुळे शहर विधानसभा जागेबाबत आमदार निलेश लंके यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, कि अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी धुळे शहर विधानसभेच्या जागेसाठी आपला उमेदवार देणार असल्याची तयारी दाखवली. या नंतर मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात जागा वाटपाबाबत तीनही पक्षाचे प्रमुख दिल्लीतील हाय कमांड समोर बसतील व त्यानंतरच जागा वाटपाचा निर्णय होईल असे सांगितले. 

पुणे जिल्हा नियोजन सदस्यांनी अजित पवार यांच्या निर्णयाला भाजप व शिंदे गटातर्फे झालेल्या विरोधावर मंत्री गिरीश महाजन यांनी मत व्यक्त केले. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीदरम्यान जनता शंभर टक्के मत भाजप व मित्र पक्षांना देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणार असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केल आहे. पुणे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अजित पवार यांना आठशे कोटींच्या कामासंदर्भात भाजप व शिंदे गटातर्फेचे विरोध करण्यात आला असल्यावर विचारणा केली असता, मंत्री गिरीश महाजन यांनी आम्हा तीनही पक्षांमध्ये संगणमत असून आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. परंतु एखादा गोष्टीवरून मतमतांतर झाल असेल परंतु २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही तिघही एकत्र आहोत; असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT