Beed News : हृदयद्रावक! वृद्ध पत्नी कापूस वेचायला गेली, घरात अनर्थ घडला; झोपलेल्या अंध पतीचा आगीत होरपळून मृत्यू

Beed News : बीडच्या आलापुर येथील रामभाऊ शहाणे आणि रुक्मिणीबाई शहाणे हे दांपत्य गावात पत्री शेड असलेल्या घरामध्ये राहत होते.
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील आलापुर येथे पत्र्याच्या शेड असलेल्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीत (Fire) घरामध्ये असलेल्या एका अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची (Beed) दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा अंध वृद्धाची पत्नी कापूस वेचणीच्या कामासाठी शेतात गेली होती.  (Latest Marathi News)

Beed News
Amalner News : उभ्या कारला अचानक लागली आग; कारमध्ये झोपलेले दोघे जखमी

बीडच्या आलापुर येथील रामभाऊ शहाणे आणि रुक्मिणीबाई शहाणे हे दांपत्य गावात पत्री शेड असलेल्या घरामध्ये राहत होते. दरम्यान आज सकाळी रुक्‍मीणीबाई या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. तर अंध असलेले रामभाऊ हे आजारी असल्याने ते घरातच झोपून होते. मात्र दुपारच्या वेळी अचानक त्यांच्या शेडमध्ये आग लागली आणि काही वेळातच आग एवढी पसरली की संपूर्ण घर आगेच्या भक्षस्थानी गेले. यामध्ये रामभाऊ शहाणे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
Bus Accident: धावत्या बसचे टायर फुटल्याने कठडा तोडून गेली खाली; पाच महिला जखमी

ग्रामस्थांचे प्रयत्न वाचवू नाही शकले प्राण
आग लागल्याची माहिती मिळताच गावकरी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र अंध असलेल्या रामभाऊ यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेडच्या बाहेर येता आलं नाही. त्यामुळे आग विझवण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी शेडमध्ये मृत्यू झाला. दरम्यान यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Beed News
Fraud Case : सिमेंटमध्ये भेसळ व कमी वजन; शेतकऱ्याच्या तक्रारीवरून वितरकावर फसवणुकीचा गुन्हा

धर्माबाद शहरात तीन दुकानांना आग
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील धर्माबाद शहरात तीन दुकानांना भीषण आग लागून २० लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले. धर्माबाद शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानांना पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीत सर्वाधिक नुकसान फोटो स्टुडिओचे झाले आहे. यात स्टुडिओतील कॅमेरे, फोटो अल्बम, हार्ड डिस्क आणि इतर साहित्य जाळून राख झाले. तसेच बाजूला असलेली मोबाईल शॉप आणि हार्डवेअरच्या दुकानाचे देखील नुकसान झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने इतर दुकानापर्यंत आग पसरली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com