Taloda News Saam tv
महाराष्ट्र

Taloda News : गहू-तांदळाचा काळाबाजार; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar News : गहू, तांदूळ नेमका कोणत्या ठिकाणी काळ्या बाजारात जाणार होता. याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

साम टिव्ही ब्युरो

तळोदा (नंदुरबार) : धडगावकडून गहू, तांदूळ भरून येणारा ट्रक पकडण्यात आला. ट्रकचालकाकडे कुठलेही धान्य बिल आढळून न आल्याने काळ्या बाजाराची वाहतूक करत असल्याने ट्रकसह नऊ लाख ६१ हजार ४५० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून (Taloda) तळोदा पोलिस ठाण्यात आणण्यात आला. (Breaking Marathi News)

तळोदा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. सदर ट्रकमध्ये ७३ हजार ७०० रुपये किमतीचा ६७ कट्टे ३३.५० किलो वजन असलेला गहू व ८७ हजार ७५० रुपये किमतीचा ६५ कट्टे ३२.५० किलो वजन असलेला (Rice) तांदूळ नेण्यात येत होता. सदरचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना कोठार गावाच्या रस्त्याच्या उतारावर धडगाव- तळोदा रस्त्यावर मिळून आला. (Wheat) गहू, तांदूळ नेमका कोणत्या ठिकाणी काळ्या बाजारात जाणार होता. याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी (Police) हा माल जप्त केला आहे. पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात चालक भिका गुलाबसिंग ठाकरे (रा. निगदी, ता. धडगाव, जि. नंदुरबार) तसेच चालकाचा मदतनीस आकाश दिलीप ढोले (रा. वडफड्या, ता. धडगाव, जि. नंदुरबार) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. यात मोठे मासे गळाला लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

SCROLL FOR NEXT