Dhule Traffic Police
Dhule Traffic Police Saam tv
महाराष्ट्र

Dhule Traffic Police : रिक्षा चालकांवर कारवाई; हद्दपार असलेल्या १० स्क्रॅप रिक्षा जप्त

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडत रिक्षा चालवून वाहतुकीस अडथळा (Dhule) निर्माण करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान (Police) पोलिसांनी दहा रिक्षा जप्त केल्या आहेत. (Breaking Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांबाबत प्रवासी आणि खुद्द रिक्षा संघटनांकडूनच तक्रारी आल्या  होत्या. यानंतर धुळे शहर वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) बेकायदा आणि नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक विभागाने अनेक रिक्षांची धुळे शहरात विविध ठिकाणी तपासणी करत स्क्रॅप रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


धुळे शहरात मोठ्या प्रमाणात हद्दपार असलेल्या स्क्रॅप रिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची माहिती वाहतूक शाखेला प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या उपस्थितीत वाहतूक शाखेतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान १० रिक्षा वाहतूक शाखेतर्फे जप्त करत पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: वादळी वारे अन् तुफान गारपीट, पुणे- सातारा, सांगलीला अवकाळी पावसाने झोडपलं

Rain News: अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शिरूरमध्ये पावसामुळे केळीची बाग भुईसपाट

Today's Marathi News Live : दामोदर पार्कपासून नरेंद्र मोदींच्या रोड शोची होणार सुरुवात

Maharashtra Weather News: पुढच्या ४८ तासांत या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

PM Narendra Modi : प्रफुल पटेलांनी PM नरेंद्र मोदींना घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटलं तोडं

SCROLL FOR NEXT