Dhule Crime : सुगंधित सुपारीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्याला अटक; १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, शिरपूर पोलिसांची कारवाई

Dhule Crime : मुंबई आग्रा रोडवर इंदौरकडून शिरपूरमार्गे राज्यात अवैधरित्या सुगंधित सुपारीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकला सांगवी पोलिसांनी अटक केलीय. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या चेक पोस्टवर या ट्रकची तपासणी करण्यात आली होती.
Dhule Crime : सुगंधित सुपारीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्याला अटक; १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, शिरपूर पोलिसांची कारवाई
Published On

Shirpur Police Arrested Betel Nut Smuggler:

प्रतिबंधित असलेल्या सुंगधित सुपारीची अवैध वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पळासनेर गावाजवळ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या चेक पोस्टवर संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांना सुगंधित सुपारी मोठ्या प्रमाणात आढळून आली. (Latest News)

मुंबई आग्रा रोडवर इंदौरकडून शिरपूरमार्गे राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधित सुपारीची विना परवाना अवैधरित्या वाहतूक होत आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीद्वारे राष्ट्रीय महामार्ग पळासनेर गावाजवळ लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर संशयित वाहनांचा तपास सुरू असताना मध्य प्रदेशमधून आलेल्या एम.एच.१२ क्यु.डब्ल्यु.३२२४ सुपारी आढळून आली.

तस्करीसाठी वापरण्यात येणारा ट्रक पोलीस ठाण्यात आणून दोन पंच बोलावून ट्रकची ताडपत्री उघडून तपासणी केली १२ लाख ९६ हजार किमतीची प्रतिबंधीत असलेली अण्टी स्वीट सुपारी, डार्लिंग इलायची स्वीट सुपारी मिळून आली आहे. यावरुन वाहनचालक नुरमहंमद मेहबुब पठाण, वय ४९ याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमाच्या कलमांतर्गच गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ हे करीत आहेत.

धुळे जिल्ह्यातील चौघा सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोठी कारवाई काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. धुळ्याच्या केज तालुक्यातील चार गुन्हेगारांवर पोलिसांनी दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी हे आदेश दिलेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील चार सराईत गुन्हेगारांना धुळे पोलिसांनी दोन वर्षांकरिता हद्दपार केले.हे चारही सराईत शिरपूर तालुक्यातील राहणारे आहेत या चौघांवरही विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांच्यापासून जिल्ह्यातील नागरिकांना धोका असल्याचे लक्षात घेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

Dhule Crime : सुगंधित सुपारीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्याला अटक; १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, शिरपूर पोलिसांची कारवाई
Pune Crime: होळीनिमित्त हुल्लडबाजी अन् नागरिकांवर फुगे फेकले; तरुणांच्या पालकांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com