Gujarat Crime : दिवसाढवळ्या 400 रुपयांसाठी तरुणाला संपवलं; घटना सीसीटीव्हीत कैद

Gujarat Crime News in marathi :गुजरातच्या सूरतमध्ये दिवसाढवळ्या ४०० रुपयांसाठी हत्या करण्यात आली आहे. या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आलं.
Mumbai police
Mumbai police Saam Tv

Gujarat News in Marathi :

गुजरातच्या सूरतमध्ये दिवसाढवळ्या ४०० रुपयांसाठी हत्या करण्यात आली आहे. या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Latest Marathi News)

पोस्टमार्टममधून हत्येचा गुन्हा उघड

मीडिया रिपोर्टनुसार, नानपुरा मक्काई पूल वर्तुळाजवळ ११ मार्चला पोलिसांना एक मृतदेह आढळला. या नंतर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं कारण शवविच्छेदन अहवालात उघडकीस आलं आहे.

पोलिसांनी (Gujarat Police) या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी आजूबाजूचे सीसीटीव्ही देखील तपासले. त्यातील एका सीसीटीव्हीमध्ये एक जण तरुणाला मारहाण करताना दिसत आहे.

Mumbai police
Crime News: कोलकात्यामध्ये पत्नीची हत्या करून ८४ वर्षीय डॉक्टरने केला आत्महत्येचा प्रयत्न;धक्कादायक कारण आलं समोर

हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद

आरोपीची ओळख रामकिशोर प्रधान या नावाने झाली आहे. रामकिशोर आणि मृत तरुण दोघेही फुटपाथवर राहायचे. दोघांमध्ये ४०० रुपयांवरून भांडण झालं. रामकिशोरने रागाच्या भरात पुरिया उर्फ भूरिया याला मारहाण केली.

Mumbai police
Palghar Crime News: प्रेयसीची हत्या करणाऱ्या युवकास पश्चिम बंगालमधून अटक, डहाणू पोलिसांची कारवाई

आरोपी गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांत आरोपी रामकिशोरच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघांमध्ये ४०० रुपयांवरून भांडण झाले. या हत्येचा खुलासा पोस्टमार्टममध्ये झाला आहे. तर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

भुरिया आणि रामकिशोर हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. ते दोघेही फुटपाथवर राहत होते. रामकिशोरने भुरियाला ४०० रुपये दिले होते. त्यामुळे रामकिशोर त्याचे पैसे भुरियाकडे मागत होता. भुरिया त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे रागाच्या भरात रामकिशोरने भुरियाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत भुरियाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com