Pune Crime: होळीनिमित्त हुल्लडबाजी अन् नागरिकांवर फुगे फेकले; तरुणांच्या पालकांवर गुन्हा दाखल

Pune Latest News: पुण्यामध्ये होळीच्या दिवशी एफ.सी रोडवर हुल्लडबाजी करत येणा- जाणाऱ्या नागरिकांवर काही तरुणांकडून पाण्याचे फुगे टाकण्याचा प्रकार घडला होता.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

अक्षय बडवे, पुणे|ता. २८ मार्च २०२४

Pune Crime News:

पुण्यामध्ये होळीच्या दिवशी एफ.सी रोडवर हुल्लडबाजी करत येणा- जाणाऱ्या नागरिकांवर काही तरुणांकडून पाण्याचे फुगे टाकण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी कडक कारवाई केली असून या तरुणांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील एफ सी रोडवर हुल्लडबाजी करत नागरिकांवर फुगे टाकण्यात आल्याचा प्रकार घडला होता. होळीच्या दिवशी काही तरुण संध्याकाळी पुण्यातील एफ सी रोड वरून हुल्लडबाजी करत होते. गाडीवर जाताना ते रोड वरून जात असलेल्या आणि उभे असलेल्या नागरिकांवर रंगाचे फुगे फेकत होते.

या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून तसेच गाडीचा क्रमांक ट्रेस करून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचा शोध लावला आणि त्यांना ताब्यात घेतले. यामधील ताब्यात घेतलेले आरोपी हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune Crime News
Shivsena Candidate List: ब्रेकिंग! शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; धैर्यशील माने, श्रीरंग बारणेंना संधी

दरम्यान, पोलिसांनी या हुल्लडबाजी प्रकरणी तरुणांना उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली. तसेच मोटर वाहन कायदा प्रमाणे त्यांच्या पालकांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
Maharashtra Lok Sabha Election : नाशिकची जागा अखेर राष्ट्रवादीच्या पारड्यात? साताऱ्याच्या बदल्यात नाशिक मिळवलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com