Maharashtra Lok Sabha Election : नाशिकची जागा अखेर राष्ट्रवादीच्या पारड्यात? साताऱ्याच्या बदल्यात नाशिक मिळवलं?

Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत सेना विरूद्ध राष्ट्रवादी अशी रस्सीखेच सुरू होती. मात्र ही जागा आता राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionSaam Digital
Published On

Lok Sabha Election 2024

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत सेना विरूद्ध राष्ट्रवादी अशी रस्सीखेच सुरू होती. मात्र ही जागा आता राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. साताऱ्याची जागा भाजपाला दिल्यामुळे राष्ट्रवादीने त्याबद्दल नाशिकची जागा घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी या जागेसाठी जोरदार फिल्डींग लावली होती. या संदर्भात आज एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र त्यांच्या पदरात निराशा पडण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार असल्यामुळे हा मतदासंघावर शिवसेनेने दावा केला होता. शिंदे गटाने त्यांनी उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू अशताना शिंदे गटाने हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे सध्या या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर यांनी हेमंत गोडसे नाशिकहून शेकडो गाड्या घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. मात्र ना शिवसेना ना भाजप ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाण्याची दाट शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार उदयनराजे भाेसले यांना भारतीय जनता पक्षातून उमेदवारी मिळाल्याचे संकेत मिळत आहे. केवळ अधिकृत घाेषणा हाेणे बाकी आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने सातारा लाेकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दावा करीत आहेत. मंगळवारी (ता. 26) देखील पवार यांनी भाजपचे नेते उदयनराजे भाेसले यांना समजावून सांगतील असे सूचक विधान केले.खासदार उदयनराजे भाेसले हे काेणत्या चिन्हावर निवडणुक लढविणार हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी त्यांच्या समर्थकांनी कमळ चिन्हासह त्यांचे फलक लावले होते. त्यामुळे ते कमळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात.

Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election : हातकणंगलेत तिरंगी लढतीची शक्यता; दिग्गज नेत्याच्या मुलानं ठोकला शड्डू

राष्ट्रवादी अजित पवार गटाने उदयन राजे भोसले यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरला होता. मात्र भाजपमधून उमेदवारी निश्चित झाल्यामुळे त्या बदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडली जाऊ शकते. तसे संकेत मिळत आहेत आणि ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर छगन भुजबळ उमेदवारीचे प्रबळ दावेदार असतील. त्यामुळे शिवसेना आणी राष्ट्रवादीत या जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lok Sabha Election
उद्धव ठाकरेंनी देऊ केलेली उमेदवारी नाकारली, चेतन नरकेंचा कोल्हापुरातून लढण्याचा निर्धार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com