Shivsena Candidate List: ब्रेकिंग! शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; धैर्यशील माने, श्रीरंग बारणेंना संधी

Loksabha Election 2024: महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेच्या आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Tv
Published On

Shivsena Shinde Group Candidate List:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेच्या आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेच्या आठ जागांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून राहुल शेवाळे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, शिर्डी लोकसभेसाठी सदाशिव लोखंडे, बुलढाणा प्रतापराव जाधव, हिंगोली हेमंत पाटील, रामटेक राजू पारवे, कोल्हापूर संजय मंडलिक तसेच मावळ लोकसभेसाठी श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नाशिक, यवतमाळमध्ये घोषणा नाही..

भाजप आणि शिवसेनेमध्ये अनेक ठिकाणी जागावाटपावरुन मतभेद असल्याची चर्चा सुरु होती. अशा वाद असलेल्या जागांवर अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामध्ये नाशिक, कल्याण डोंबिवली,यवतमाळ या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आठ उमेदवार!

दक्षिण मध्य - राहुल शेवाळे

कोल्हापूर - धैर्यशील माने

शिर्डी - सदाशिव लोखंडे

बुलढाणा - प्रतापराव जाधव

हिंगोली - हेमंत पाटील

रामटेक - राजू पारवे

हातकणंगले - संजय मंडलिक

मावळ - श्रीरंग आप्पा बारणे

CM Eknath Shinde
उद्धव ठाकरेंनी देऊ केलेली उमेदवारी नाकारली, चेतन नरकेंचा कोल्हापुरातून लढण्याचा निर्धार

कोणाविरुद्ध होणार सामना?

दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे असा सामना रंगणार आहे. तसेच शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे, बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव, हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील, तसेच मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CM Eknath Shinde
Maharashtra Lok Sabha Election : नाशिकची जागा अखेर राष्ट्रवादीच्या पारड्यात? साताऱ्याच्या बदल्यात नाशिक मिळवलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com