Parbhani News : दुष्काळाचे सावट; चारा टंचाईने गोधन विक्रीस, ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Parbhani News : परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. यात आतापासून पाण्याची समस्या गडद झाली
Parbhani News
Parbhani NewsSaam tv

परभणी : यंदा पावसाळा कमी झाल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे. पाणी टंचाईसोबतच आता चारा टंचाईची (Parbhani) समस्या समोर आली आहे. यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. चारा टंचाई प्रकर्षाने जाणवत असल्याने (Farmer) शेतकरी गोधन विक्रीस आणू लागले आहेत. (Maharashtra News)

Parbhani News
Bribe Case Court Judge : एक हजार रुपयांसाठी ७ वर्षांच्या कारावाससह १० हजार रुपयांचा दंड; शाळेच्या दाखल्यासाठी घेतली होती लाच

परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. यात आतापासून पाण्याची समस्या गडद झाली असून, चारा टंचाईचे देखील सावट उभे आहे. आहे त्या चाऱ्याचा भाव वाढल्याने सामान्य शेतकरीला घेणे परवडणारे नाही. परभणी जिल्ह्यात आतापासून (Drought) दुष्काळाने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्या कारणाने शेतकरी दुभत्या गायी, म्हशी, शेळी औताला असलेल्या बैल जोड्या बाजारात विकण्यासाठी आणत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parbhani News
Unseasonal Rain : जळगावसह धुळ्यात अवकाळी पाऊस; गहू, हरभरा पिकाला फटका

शेतकरी तसेच व्यापाऱ्याना आपली जनावरे बाजारात आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च तसेच बाजारामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा खर्च करावा लागतो. पण बाजारात कोणीही ग्राहक नसल्याने हा खर्च शेतकरी व्यापाराच्या माथी पडतो. दरम्यान ग्राहकच नसल्याने भर उन्हात दिवसभर उभे राहून विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. खर्च करून देखील आपली जनावरे परत घरी घेऊन जावी लागत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com