Scene of the horrific truck collision in Dhule where 70 goats and one driver lost their lives. Saam Tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात अपघाताचा थरार! दोन ट्रकची जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर ७० बकऱ्या मृत्यूमुखी

Dhule Truck Accident Kills Driver And 70 Goats: धुळ्यातील शिरपूर तालुक्यात पळासनेर येथे दोन ट्रकची भीषण धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर ७० हून अधिक बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या.

Omkar Sonawane

भूषण आहिरे, साम टीव्ही

धुळ्यामध्ये दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. शिकपूर तालुक्यातली पळासनेर याठिकाणी अपघाताची ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याच्या शिरपूरमधील पळासनेर या ठिकाणी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. एका ट्रकने बकऱ्या घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघतामध्ये ट्रकमधील ७० पेक्षा जास्त बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक बकऱ्या जखमी झाल्या. पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इंदुरवरू धुळ्याच्या दिशेने हे दोन्ही ट्रक येत होते. ज्या ट्रकने बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक दिली त्यामध्ये मक्याच्या गोण्या होता

दरम्यान, या अपघातानंतर संपूर्ण रस्त्यावर मक्याची पोती पडली. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही ट्रकचे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला. तर मृत्यूमुखी पडलेल्या बकऱ्यांना देखील बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताचा पुढील तपास महामार्ग पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

SCROLL FOR NEXT