कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत भीषण अपघात.
भरधाव ट्रक मिरवणुकीत घुसल्याने ९ जणांचा मृत्यू, २२ जण गंभीर जखमी.
मृतांमध्ये तरुणांचा मोठा समावेश, अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली.
पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
Ganesh Visarjan Accident Video : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत बेफाम होऊन तरूणाई नाचत होती. त्याचवेळी अचानक भरधाव वेगात आलेला ट्रक मिरवणुकीत घुसला. ट्रकने ३० ते ४० जणांचा चिरडले. या भयंकर दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ जण गंभीर जखमी असल्याचे समोर आलेय. काही जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना कर्टाकमधील हासन जिल्ह्यात घडली. या घटनेनंतर हासन जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पुढील तपास सुरू केला आहे.
शुक्रवारी कर्नाटकमध्ये गणपती विसर्जनाचा उत्साह होता. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. वाजतगाजत गणरायाला निरोप दिला जात होता. पण याच उत्साहावर विरजन पडलेय. कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील एका गावात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत भरधाव वेगातील ट्रक घुसला अन् ९ जणांचा जीव घेतला. २२ ते २५ जण या दुर्घटनेत जखमी आहेत. यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. Video of truck crashing into Ganesh procession goes viral
अपघातातील जखमींपैकी ८ जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समोर आलेय. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. चालकाला ताब्यात घेतले असून तपास सुरू करण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केलेय. मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जानाच्या दिवशी रात्री ८.४५ वाजता ही दुर्घटना घडल्याचे समोर आलेय. या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये तरूण बेफाम होऊन गाण्यावर नाचत असताना दिसत आहेत. त्याचवेळी अचानक ट्रक मिरवणुकीत घुसल्याचं दिसतेय. मृतांमध्ये २० ते २५ वर्षांच्या मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर हासन येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रक घुसल्याने दुर्घटना झाल्यानंतर चालकाने फरार होण्याचा प्रयत्न केला. पण उपस्थित जमावाने त्याला पकडले अन् बेदम चोपला. चालकाचे नाव भुवसनेश असे समजतेय. घटानस्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी भुवसनेश याला ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक एका ‘लॉजिस्टिक्स’ कंपनीचा होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.