Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : नात्याला काळिमा; काकाकडून तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संशयित पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : चिमुकलीला खेळविण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून आजीजवळून घेत मुलीचा चुलत काका घरी घेऊन गेला. यानंतर घरात कोणी नसताना तिच्या अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे

Rajesh Sonwane

धुळे : अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच नात्यात असलेल्या चुलत काकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

लहान मुली तसेच तरुण अत्याचाराला बळी पडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशात धुळे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत २९ सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास दूधवाला आला असताना पीडितेची आजी तिला घेऊन बाहेर गेली. त्या वेळी शेजारीच राहणारा चुलत काका तिला खेळण्यासाठी घेऊन जातो, म्हणून आपल्या घरी घेऊन गेला. 

काकाकडे गेलेली चिमुकली काही वेळाने घरी परत आली. तर रात्री झोपण्याच्या तयारीत असताना पीडिता अचानक रडू लागली. आईने विचारले असता तिने दुखत असल्याचे सांगितले. यावेळी आई आणि आजीने तिला नेमके काय झाले, अशी विचारणा केली असता, तिने काका घरी घेऊन गेला आणि भगत येत आहे, असे सांगून दरवाजा बंद करत घडल्या प्रकारची माहिती दिली. 

मुलीने सांगितलेल्या घटनेने कुटुंब हादरले. यानंतर आईने तात्काळ पीडितेच्या वडिलांना घटनेची माहिती देत घरी बोलावले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यावरून सोनगीर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी संशयित पीडितेच्या काकाला अटक केली आहे. अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सासूचा ५ महिन्यांपूर्वी मृत्यू, नवरा राहायला परराज्यात; रिटायर नेव्ही अधिकाऱ्याची सूनेनं केली हत्या, त्या दिवशी भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: पुण्यात टोळक्याकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड

BMC Election: BMC साठी भाजपकडून १३७ उमेदवारांची फायनल यादी जाहीर, वाचा कुणाला कुठून मिळाले तिकीट?

New Year 2026: भारताच्या ८ तास आधीच 'या' देशात नवीन वर्ष सुरू; जगभरात जल्लोषाला सुरुवात!

Happy New Year! ऐन वेळी स्टेटस शोधू नका; 'इथे' वाचा WhatsApp-Facebook साठी मराठी, हिंदी आणि English शुभेच्छा मेसेज

SCROLL FOR NEXT