Electric Shock : वेल्डिंग काम करताना घडले दुर्दैवी; विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

Jalgaon News : वेल्डींगचे काम करत असताना घडलेल्या दुर्दैवी घटने तरुणाचा मृत्यू झाला असून या घटनेने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या मृत्यू आई- वडिलांनी एकच आक्रोश केला
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

जळगाव : एका कंत्राटदाराकडे मजुरीवर वेल्डिंगचे काम करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे. वेल्डिंग काम करत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यात घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

जामनेर तालुक्यातील धानवड तांडा येथील मूळ रहिवासी प्रदीप दरबार चव्हाण (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रदीप चव्हाण हा धानवड तांडा येथे आई- वडील व मोठा भाऊ यांच्या समवेत वास्तव्यास होता. वेल्डिंगचे काम शिकून तो खासगी कंत्राटदाराकडे वेल्डिंगची कामे करून कुटुंबाला हातभार लावत होता. दरम्यान बुधवारी नेहमीप्रमाणे प्रदीप डबा घेऊन कामावर निघून गेला. 

Electric Shock
Jalgaon Accident : अष्टमीची पूजा करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला; डंपरच्या धडकेत कार पुलावरून कोसळली, आई- मुलाचा मृत्यू

काम करत असताना विजेचा झटका 

तर दुपारी चारच्या सुमारास वेल्डिंगचे काम करीत असताना त्याला वीज जोडणी करताना जोरदार धक्का बसला. यात तो दूरवर फेकला गेला. त्यात त्याचा मृत्यू झाला. सोबतच्या कामगारांनी तातडीने त्याला जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीय, नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.

Electric Shock
Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगावच्या मेहरूण तलावातील घटना

वाहनाच्या धडकेत वॉचमन ठार
जळगाव शहरातील मेहरुण येथील रहिवासी वासुदेव दशरथ सानप (वय ६०) एमआयडीसीत खासगी कंपनीत वॉचमन म्हणून कार्यरत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे रात्री ते कामावर जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरील क्रमांकावरून त्यांची ओळख पटली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com