जळगाव : जळगाव तालुक्यातील विदगाव जवळील तापी नदीच्या पुलावर सुसाट वाळूच्या डंपरने कारला जोरदार धडक दिली. यामुळे कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली. यात आईश मोठ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारचालक असलेले शिक्षक व त्यांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहे. जखमींना लागलीच जळगाव येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीच्या पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. यात मीनाक्षी चौधरी (वय ४०) व मुलगा पार्थ चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान जळगाव शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेले नीलेश चौधरी (वय ४५) हे धानोरा येथील शाळेत शिक्षक असून, त्यांच्या पत्नी मीनाक्षी चौधरी शिवाजीनगरमधील पाटणकर शाळेत शिक्षिका आहेत. शिक्षक दांपत्य हे मुलगा पार्थ (वय १२) आणि ध्रुव (वय ६) यांच्यासह कारने चोपडा येथे नातेवाइकांकडे अष्टमीच्या पूजेसाठी गेले होते. पूजेनंतर जेवण आटोपून चौधरी कुटुंब मुलांसह जळगावला येण्यासाठी निघाले.
कार कोसळल्याने झाला मोठा आवाज
रात्री अकराच्या सुमारास विदगाव जवळील तापी नदी पुलावर कारला समोरून आलेल्या सुसाट डंपरने जोरदार धडक दिली. यामुळे कार कठडा तोडून खाली कोसळली. यात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला होता. कार कोसळल्याने अपघाताच्या आवाजाने विदगावातील तरुण अपघातस्थळी आले. तसेच रस्त्यावरील वाहन धारकांसह ग्रामस्थ मदतीला सरसावले. यानंतर कारमधील चौघांना बाहेर काढण्यात आले.
जखमींना रुग्णालयात केले दखल
पुलावरून कोसळलेली कार नदीकाठावरील खडक आणि झुडपात पडली होती. यावेळी ग्रामस्थांनी कारमधील चिमुरडा ध्रुव तसेच त्याचे वडील नीलेश यांना जखमी अवस्थेत बाहेर काढत लागलीच जळगावात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मीनाक्षी चौधरी आणि मोठा मुलगा पार्थ या दोघांचा कारमध्येच मृत्यू झाला होता. मृतदेह बाहेर काढून खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.