अमर घटारे
अमरावती : पावसामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असताना शेतकऱ्यांना तुटपुंजी अशी भरपाई सरकारकडून देण्यात येत आहे. या विरोधात प्रहार संघटना व शेतकऱ्यांकडून चिल्लर गोळा करून ताट व वाटी वाजवत तहसीलदारांच्या टेबलावर गोळा केलेले पैसे टाकून सरकारचा निषेध करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. कपाशी, सोयाबीन, केळी, संत्रा या मुख्य पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आता हवालदिन झाला आहे. तर दुसरीकडे दसऱ्याच्या तोंडावर राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान केवळ १७०० रूपये भरपाई देण्यात येत आहे. मात्र सरकारने दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांची भीक देऊन थट्टा केली असून या सरकारला जाब विचारण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना पाठविलेली भीक सरकारला परत
अमरावतीच्या चांदूर बाजार तहसील कार्यालयावर प्रहार कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने ताट, वाटी वाजवत व चिल्लर पैसे गोळा करून तहसीलदारांच्या टेबलवर पैसे टाकून सरकारचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना पाठवलेली भीक ही सरकारला आम्ही परत करतो; अशी भावना संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोर व्यक्त केली होती. त्यामुळे काही वेळ तहसील कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर संतप्त शेतकऱ्यांनी स्थानिक आमदाराला सुद्धा चांगले धारेवर धरले.
नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार
सोलापूर जिल्ह्यातील कांदा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोलापुरात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या महापुरात हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं आहे. दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ९० टक्के कांदा अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खराब झाला आहे. जिल्ह्यातील चाळीस हजारहून अधिक हेक्टर कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी केंद्राचे तीन सदस्य पथक सोलापुरात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.