Cockroaches Found In Khichadi Saam Tv
महाराष्ट्र

Midday Meal Scheme: विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! मध्यान्ह भोजनात झुरळ तर पोषण आहारात बेडूक, राज्यात चाललंय तरी काय?; पाहा VIDEO

Priya More

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. कधी पोषण आहारामध्ये झुरळ, आळ्या, उंदरांच्या लेंड्या आढळल्याच्या बातम्या समोर आल्या. तर कधी मध्यान्ह भोजनामध्ये देखील अशाचप्रकारचे अन्न दिलं जात असल्याचे देखील आपण पाहिले आहे. अशामध्ये आता धाराशिवमध्ये पोषण आहारामध्ये (Shaley Poshan Aahar) मृत बेडूक आढळले आहे. तर घाटकोपरच्या (Ghatkopar) एका शाळेमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये (Mid-day meal) झुरळ आढळले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात तळलेला मृत बेडूक आढळला आहे. धाराशिवच्या पाडोळी गावातील ही धक्कादायक घटना आहे. खिचडी या शालेय पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये बेडूक आढळून आला आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेत ६ महीने ते ३ वर्षे या वयोगटातील बालकांना तूर डाळ आणि खिचडीचे पॅकेट दिले जाते.

धाराशिवच्या पाडोळी गावातील पुनम सौदागरला आहाराचे पॅकेट देण्यात आले होते. सौदागर कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर महीला व बालविकास अधिकारी यांनी समक्ष पंचनामा केला. पुरवठा करणाऱ्या संबधित कंपनीवर कडक कारवाई करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. वारंवार शालेय पोषण आहारात साप, किडे, मुंग्या, आळ्या आढळत असल्याने आहार नेमका बनवतात तरी कुठे? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तर दुसरीकडे, मुंबईच्या घाटकोपरमधील एका शाळेमध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामध्ये झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. घाटकोपर पश्चिमच्या केव्हीके स्कूलमधील हा प्रकार आहे. मध्यान्ह भोजनात शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडी भातामध्ये झुरळ आढळले. एका आठवीच्या विद्यार्थिनीने शिक्षकांच्या लक्षात ही बाब आणून दिली. या खिचडीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकानी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT