Dharashiv crime Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv crime : चालकाची चलाखी! ATM मध्ये भरण्याऐवजी बॅंकेचे ₹ ८५ लाख घेऊन पळाला; कर्नाटकापर्यंत तपासचक्रे फिरली अन्...

Dharashiv News : एचडीएफसी बँक येथील एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरने तब्बल ८५ लाख रुपये घेऊन पळ काढल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: एटीएम मशीनमध्ये कॅश भरण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था असते. ही गाडी दिवसभरात वेगवेगळ्या एटीएम मध्ये जाऊन भरणा (dharashiv News) करत असतात. मात्र अशाच प्रकारे भरणा करण्यासाठी दिलेले ८५ लाख रुपयांची रक्कम घेऊन गाडीवरील चालक फरार झाला होता. त्याच्यासह अन्य दोघांना (Police) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  (Breaking Marathi News

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरातील एचडीएफसी बँक (Bank) येथील एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरने तब्बल ८५ लाख रुपये घेऊन पळ काढल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. त्या (ATM) अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरु होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांनी केलेला चोरीचा गुन्हा देखील मान्य केला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संपूर्ण रक्कम हस्तगत 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघा आरोपींकडून सर्व ८५ लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. तसेच त्यांनी आणखी काही ठिकाणी चोरीचे प्रकार केले आहेत का? याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भांडुप पश्चिम येथे स्टेशन प्लाझा इमारतीचा भाग कोसळला

Mumbai Hotels: युद्धाच्या भडक्यामुळे मुंबई गॅसवर, मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद

Lapwing Bird: टिटव्या स्वप्नात ओरडताना दिसणं शुभ की अशुभ? जाणून घ्या सत्य

राज्यातील बड्या IAS अधिकाऱ्याचे निलंबन मागे, अचानक निर्णय का बदलला?

वाजवा रे ढोल-ताशा, T20 वर्ल्ड कप जिंकून आलाय सूर्यादादा! टीम इंडियाच्या कर्णधाराचं मुंबईत जंगी स्वागत| Video Viral

SCROLL FOR NEXT