Lok Sabha Election : मद्य विक्री ३० टक्क्यांवर वाढल्यास परवानाधारकांची होणार चौकशी; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदेश

Sambhajinagar News : निवडणूक कोणतीही असो या कालावधीत कार्यकर्ते तसेच काही निकटवर्तीयांसाठी पार्टीचे नियोजन केले जात असते. शिवाय या कालावधीत मद्य विक्रीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले असते.
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरात (Sambhajinagar) येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी आता पथके नेमली आहे. त्याबरोबरच नेहमीपेक्षा ३० टक्के जास्त मद्य विक्री (Liquor) झाल्यास संबंधित परवानाधारकाची चौकशी केली जाणार असल्याचेही आदेश दिले. (Tajya Batmya)

Sambhajinagar News
Jalgaon Temperature : जळगाव जिल्हा उन्हाने तापला; जिल्ह्यातील सर्वच शहरातील तापमान ४२ अंशाच्या वर

निवडणूक कोणतीही असो या कालावधीत कार्यकर्ते तसेच काही निकटवर्तीयांसाठी पार्टीचे नियोजन केले जात असते. शिवाय या कालावधीत मद्य विक्रीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. यावर नियंत्रण राहावे यासाठी आगामी (Lok Sabha Election) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने आदेश काढले आहेत. या दरम्यान अंडा आमलेट, चायनीज खाद्यपदार्थची विक्री करणारे दुकाने आणि गाड्यांवर देखील करडी नजर ठेवली जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar News
Boycott Lok Sabha Elections : तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; वडार समाजाचा इशारा

ऍप रोज भरावी लागणार माहिती 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्ह्यात एक ॲप तयार केले असून त्यावर रोज माहिती भरणे परवानाधारकांना बंधनकारक राहील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात विशेष युवा योजना केल्या आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची ८ पथके तैनात करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे देखील आता बंधनकारक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com