उदयनराजेंना शरद पवारांनी मुलाप्रमाणे प्रेम दिलं, दडपशाही विराेधात लढणा-यांनी तुतारी हाती घ्यावी : सुप्रिया सुळे (Video)

Udayanraje Bhosale Marathi News : बुधवारी (ता. 27 मार्च) खासदार उदयनराजे भाेसले यांनी साता-यात शक्तीप्रदर्शनही केले आणि निवडणुक लढणारच असे स्पष्ट केले.
supriya sule criticises bjp for delay udayanraje bhosale name in candidate list
supriya sule criticises bjp for delay udayanraje bhosale name in candidate listsaam tv

- सचिन जाधव

Satara Lok Sabha Constituency :

उदयनराजे (udayanraje bhosale latest marathi news) यांना उमेदवारी जाहीर न होणे ही प्रचंड वेदना देणारी गाेष्ट आहे. छत्रपतींच्या गादीचा केवळ राज्यातच नव्हे तर देश परदेशात मान सन्मान आहे. हा गादीचा अपमान हाेत असल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्या भाजपच्या उमेदवारीवर बाेलताना व्यक्त केल्या. दरम्यान सुळेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उदयनराजेंवर मुलाप्रमाणे प्रेम केल्याचेही नमूद केले.(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी लाेकसभा निवडणुक लढविण्यासाठी जय्यत तयार केली आहे. बुधवारी (ता. 27 मार्च) खासदार उदयनराजे भाेसले यांनी साता-यात शक्तीप्रदर्शनही केले आणि निवडणुक लढणारच असे स्पष्ट केले. दरम्यान अद्याप त्यांची महायुतीने उमेदवारी जाहीर केली नसल्याने ते काेणत्या पक्षातून लढणार याबाबत आजही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

supriya sule criticises bjp for delay udayanraje bhosale name in candidate list
Hatkanangale Lok Sabha Election 2024 : हातकणंगले लाेकसभा मतदारसंघाची शौमिका महाडिकांवर भिस्त?

खासदार सुप्रिया सुळे यांना पुण्यात माध्यमांनी उदयनराजे भाेसले यांच्या उमेदवारीबाबत छेडले असता त्या म्हणाल्या राजेंना आम्ही आमच्या पक्षात असताना नेहमीच मान सन्मान दिला. काेणत्याही बैठकीला शरद पवार हे उदयनराजेंना त्यांच्या जवळ बसवत. शरद पवार यांनी उदयनमहाराज यांना मुलाप्रमाणे प्रेम दिले. उदयनराजेंनीही पवार साहेबांना प्रेम दिले. संघटनेनेही त्यांना प्रेम दिलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साेयीनूसार छत्रपतींच्या नावाचा भाजपकडून वापर

जेव्हा यांना राजकारणात छत्रपतींचे नाव लागते तेव्हा ते छत्रपतींचे नाव घेतात. उदयनमहाराज यांची उमेदवारीची वेळ येते तेव्हा त्यांचे नाव पहिल्या यादीत हवे हाेते असेही सुळेंनी नमूद केले. भाजप सुडाच राजकारण करत आहे. ज्यांना दडपशाही विराेधात लढायचे आहे त्यांनी तुतारी हातात घ्यावी असे आवाहनही सुळे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

supriya sule criticises bjp for delay udayanraje bhosale name in candidate list
Udayanraje Bhosale : दाेन्ही नेत्यांच्या वक्तव्याने सातारा लाेकसभा मतदारसंघ बुचकळ्यात, साता-यात उद्या भूमिका स्पष्ट करेन : उदयनराजे भाेसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com