Boycott Lok Sabha Elections : तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; वडार समाजाचा इशारा

Latur News : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ साली वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात राज्यातील वडार समाजाला अनेक आश्वासने दिली होती.
Boycott Lok Sabha Elections
Boycott Lok Sabha ElectionsSaam tv
Published On

संदीप भोसले 

लातूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाला दिलेल्या (Latur) आश्वासनांची अंमलबजावणी अद्यापपर्यंत न झाल्याने वडार समाज आक्रमक झाला आहे. यामुळे नुसते आश्वासन नको तर अंमलबजावणी हवी असे म्हणत वडार समाजाने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. (Live Marathi News)

Boycott Lok Sabha Elections
Dharashiv News : दुष्काळी परिस्थितीत जनावरांचा चाराही महागला; १०० पेंडीसाठी मोजावे लागताय इतके पैसे 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांनी २०१८ साली वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात राज्यातील वडार समाजाला अनेक आश्वासने दिली होती. मात्र त्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही, असं सांगत आज लातूर येथे मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेत राज्यातील लोकसभा मतदानावर वडार समाजाच्या वतीने बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Boycott Lok Sabha Elections
Jalgaon Temperature : जळगाव जिल्हा उन्हाने तापला; जिल्ह्यातील सर्वच शहरातील तापमान ४२ अंशाच्या वर

राज्यात ६० लाख मतदार 

वडार समाज हा लहान नसून राज्यात जवळपास ६० लाख वडार समाजाचे मतदार असल्याचं देखिल संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. सर्व समाज हा एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार टाकल्यास त्याचा परिणाम निकालात दिसून येईल; असेही संघटनेने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com