Eknath Shinde News Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांचा धाराशिवात नुकसान पाहणी दौरा; प्रशासनाने तब्बल १२ वर्षांनी केली नादुरुस्त रस्त्याची डागडुजी

Eknath Shinde latest News: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे धाराशिव प्रशासन सतर्क झालं असून तब्बल १२ वर्षांनी एका नादुरुस्त रस्त्याची डागडुजी केली आहे.

साम टिव्ही

कैलास चौधरी

Eknath Shinde News: राज्यात काही दिवसांपूर्वी वीज, वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. मुख्यमंत्री शिंदे आज धाराशिवातील शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. यामुळे धाराशिव प्रशासन सतर्क झालं असून तब्बल १२ वर्षांनी एका नादुरुस्त रस्त्याची डागडुजी केली आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावासामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त आलं आहे. याशिवाय अनेक जनावरे देखील या अवकाळी पावसात मृत पावली. तसेच या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बाग, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. धाराशिवमध्ये देखील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवात नुकसान पाहणी दौरा करणार आहे.

धाराशिवमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हटले की १२ वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मुख्यमंत्री यांचा दौरा सुरू होण्या अगोदरच रस्त्याची डागडुजी केली जात आहे.

मात्र, रस्त्याच्या डागडुजीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'आमची हाड मोडली रस्त्यावर येणे-जाणे करून मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही. आता मात्र मुख्यमंत्री येणार म्हणलं की दुरुस्ती करत आहेत, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.

प्रशासनाच्या या कामाकाजावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, गारपीटीने नुकसान झालेल्या तुळजापूर तालुक्यातील पिकांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे तुळजापूर मोरडा रस्त्याने जाणार आहेत, त्याचीच डागडुजी केली जात आहे.

आज एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.धाराशिव जिल्ह्यात अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेती-पिकांची ते पाहणी करणार आहेत. तुळजापूर तालुक्यातील मोरडा या गावात भेट देणार आहे.

या गावातील सिताबाई सुरवसे यांची गारपीटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या द्राक्ष बागेची ते पाहणी करणार आहेत. दरम्यान, तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेली ही बाग उद्ध्वस्त झाल्याने सिताबाई सुरवसे यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT