Uddhav Thackeray News: 'बाबरी'चं श्रेय घेण्यासाठी आता उंदरं बिळातून बाहेर येतायेत; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray latest News: चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मशीदीवरील वक्तव्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. श्रेय घेण्यासाठी उंदरं बिळातून बाहेर येतायेत , असं म्हणत ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून टीका केली आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, 'बाबरी मशीद पाडल्याचं श्रेय घेण्यासाठी आता सगळी उंदरं बाहेर येऊ लागली आहेत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही कुठं नव्हतं. त्यावेळी मात्र काहीही अंगलट येऊ नये म्हणून भाजपने शिवसेनेकडे बोट दाखवलं होतं. भाजपकडे कधीही शौर्य नव्हतं'.

Uddhav Thackeray
Sanjay Raut On Shinde Group: सत्तेचे मिंधे यावर तोंड उघडणार नाही; संजय राऊत असे का म्हणाले?

'बाबरी पाडल्यानंतर ज्या दंगली उसळल्या, त्यावेळीही शिवसेनेनं मुंबई वाचवली, भाजप कुठेही नव्हती. भाजपची मला कीव येत आहे. एकीकडे मोहन भागवत मशिदीत जात आहेत. आता भाजप बाबरी आम्ही पाडली सांगतं आहेत. मग यांचं हिंदुत्व नेमकं काय हे भाजपने सांगावं,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांनी हिंमत झाली नाही शेवटी निकाल कोर्टाने दिला. मिंधेंना बाळासाहेबांचे शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये'.

'बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसत ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule News: चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागितली जाहीर माफी; काय आहे प्रकरण?

'यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतःच स्वतःला जोडे मारणार आहेत?त्यांच्या कडून येऊ द्या भाजपच्या कार्यालयात सराव सुरु असेल, असा घणाघात देखील ठाकरेंनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com