Sanjay Raut On Shinde Group: सत्तेचे मिंधे यावर तोंड उघडणार नाही; संजय राऊत असे का म्हणाले?

Sanjay Raut On Shinde Group: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSAAM TV
Published On

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'बाबरी मशीद पाडण्यात एकही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे गटावरच सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत म्हणाले, बाबरी मशीद पाडली तेव्हा हे पळपुटे कुठे होते? चंद्रकांत पाटील यांनी हा आरोप बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केला आहे. यावर त्या ४० लोकांचे काय म्हणणे आहे? हिंदुत्व शिवसेनेने सोडलं असे जे तीर मारतात, यावर काय म्हणणंय? गुलाम झाल्यानेच बाळासाहेबांचा अपमान सातत्याने होतोय'.

'चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ज्या पळपुट्यांना घेऊन सरकार बनवलं, भाजपने त्यांच्या दैवतांचा अपमान होतोय. सत्तेचे मिंधे यावर तोंड उघडणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

Sanjay Raut News
Bachchu Kadu on Sanjay Raut : बच्चू कडूंचा नाराजीच्या चर्चांवर खुलासा; अयोध्या दौऱ्याला न जाण्याचं सांगितलं कारण

'मी त्यांना म्हणेल, राजीनाम द्या. त्यांना शिवसेनेचा नाव घेण्याचा अधिकार यांना नाही. हातात नकली धनुष्यबाण आणि त्यांच्या चड्डीचे नाडे पकडून अयोध्येत गेले होते. चंदक्रांत पाटील यांना इतक्या वर्षांनी बोलण्याची गरजच काय होती? हा शिवसेनेचे अस्तित्व संपवण्याचा कट आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut News
CM Eknath Shinde Threat Call: राजकीय नेत्यांना धमक्या सुरूच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा धमकी

काय म्हणाले चंद्रकांत पाटील होते?

चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, 'बाबरी मशीदीचा त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते? शिवसेना तिथे गेली होती का? बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही'.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले होते की, 'बाबरी ज्यांनी पाडली त्यात कदापी शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर तिथं नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आणि मला कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com