Uddhav Thackeray On Chandrakant Patil: 'चंद्रकांत पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा, नाही तर...', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!

Babri Masjid Demolition: 'बाबरी पाडण्यात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती.', असे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केले होते.
Uddhav Thackeray and Chandrakant Patil
Uddhav Thackeray and Chandrakant PatilSaam Tv

Mumbai News: बाबरी मशिदीबाबत (Babri Masjid) भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संतप्त झालेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा. नाही तर स्वत: राजीनामा द्यावा', अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray and Chandrakant Patil
Uddhav Thackeray News: 'बाबरी'चं श्रेय घेण्यासाठी आता उंदरं बिळातून बाहेर येतायेत; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे कडाडले

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बाबरी मशीदीबाबत (babri masjid demolition) मोठं वक्तव्य केलं. 'बाबरी पाडण्यात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती.', असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.

याप्रकरणी संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडेबोल सुनावले आहेत. 'गोमुत्रधरी चंद्रकांत पाटील हे बाबरीच्या आठवणीच्या खंडकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. पण आता हे सगळे उंदीर बाहेर पडू लागले आहेत.' असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

Uddhav Thackeray and Chandrakant Patil
India Corona Update: कोरोनाचा वेग वाढला! देशात 24 तासांत आढळले 5,676 नवीन रुग्ण; 21 जणांना गमवावा लागला जीव!

यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या नाहीतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. 'सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा. बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. चंद्रकांत पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी.' अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसंच, सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी भाजपची अवस्था झाली असल्याची टीका देखील त्यांनी केली.

Uddhav Thackeray and Chandrakant Patil
Political News : CM शिंदेंची मोठी घोषणा; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त महत्वाचा निर्णय

तंसच, उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला. 'राम मंदिराचा निकाल कोर्टाने दिला आणि त्याचे श्रेय भाजप घेत आहे. बाळासाहेबांचा ऐवढा अपमान कधी झाला नव्हता. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या भाजपसोबत आणखी किती दिवस राहणार आहात.', असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदेंना केला

तसंच, 'भाजपसोबत राहत असाल तर मिंधेंना बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये.', असे त्यांनी सांगितले. त्यासोबतच, 'बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत?.', असा सवालही त्यांनी यावेळी एकनाथ शिंदेंना केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com