Dhananjay Munde's Resignation Still Not Confirmed, saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: धनंजय मुंडेंचा अजूनही राजीनामा नाही, कारण; जयंत पाटलांचं मोठं विधान

Dhananjay Munde Resignation Still Not Confirmed: धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. मात्र तो राजीनाम खरंच झाला आहे की नाही हे जयंत पाटील यांच्या व्यक्तव्यावरून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Omkar Sonawane

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप राजीनामा झालेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ते अकलूज येथे माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

आज अकलूज येथे भाजप आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले.

सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी केला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्यावर थेट आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चेला उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर काही तासांतच धनंजय मुंडे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगून तो राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचे जाहीर केले.

जयंत पाटील काय म्हणाले?

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी सभागृहाबाहेर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. प्रत्यक्षात, सभागृहात याची माहिती दिली जाणे अपेक्षित होते. मात्र, पाच दिवस उलटून गेले तरी सभागृहाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही असे समजतो की धनंजय मुंडे यांचा अद्याप राजीनामा झालेला नाही.”

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT