
योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी
Satish Bhosale New Video : गेल्या काही दिवसांपासून सतीश भोसले उर्फ खोक्या या कुख्यात गुंडाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाप लेकाला मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील नागरिक संतापले होते. त्यानंतर खोक्या भाईचे अनेक व्हिडीओ समोर यायला सुरुवात झाली. आता सतीश भोसलेचा नवा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने भाजपचे बीडमधील आमदार सुरेश धस यांचा भाषणादरम्यान उल्लेख केल्याचे पाहायला मिळते. भोसलेने आमदार सुरेश धस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
'आता ते (सुरेश धस) आमदार आहेत. भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत अशीच आमची इच्छा आहे. मग ते कोणत्याही पक्षातून व्हावेत, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपण फक्त अण्णाप्रेमी आहोत, पुढेही अण्णाप्रेमीत राहणार. आज मी भारतीय जनता पक्षाच्या पदावर आहे. पण उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले तरी माझा राजीनामा पहिला असणार आणि आपण अण्णासोबतच राहणार' असे सतीश भोसले म्हटल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
दरम्यान सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी होत आहे. त्याच्या घरावर वन अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना हरीण, काळवीट अशा काही प्राण्यांचे मांस सापडले. या प्राण्यांना पकडण्यासाठीचे सापळे देखील घरात आढळले. लवकरच भोसलेवर कारवाई होईल असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.