Beed Crime : सुरेश धसांच्या समर्थकाला अटक करा, सतीश भोसले प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईची एन्ट्री? फेसबुक पोस्ट व्हायरल

Satish Bhosale Beed Crime : लॉरेन्स बिश्नोई या फेसबुक अकाउंटवरुन सतीश भोसलेला अटक करा अशी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. मात्र ही पोस्ट करणारी व्यक्ती लॉरेन्स बिश्नोईच आहे का याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे.
Satish Bhosale Beed Crime
Satish Bhosale Beed Crime Saam Tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Crime News : बीडच्या शिरूर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्याला मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. खोक्याने ढाकणे पिता-पुत्रांना बेदम मारहाण केली होती. त्यामुळे हे मारहाणीचे प्रकरण उघडकीस आले. वन अधिकाऱ्यांना खोक्याच्या घरी वन प्राण्यांचे मांस आढळले. याच सुमारास एका फेसबुक अकाउंटने सर्वांचे लक्ष वेधले.

लॉरेन्स बिश्नोई या नावाने फेसबुकवरच्या एका अकाउंटवरुन सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये 'बीड पोलिसांना मी विनंती करतो. लोकप्रतिनिधी सुरेश धस यांचा समर्थक सतीश भोसले याला लवकरात लवकर अटक करा. मी त्याला शिक्षा देईनच पण त्याला तुम्ही आधी तुरुंगात टाका. हरीण, काळवीट हे आमचं दैवत आहे. त्यांची शिकार करणाऱ्याला, त्यांची तस्करी करणारा माफीलायक नाही. तुम्ही त्याला ताब्यात घ्या' असे लिहिलेले आहे.

lawrence bishnoi facebook post
lawrence bishnoi facebook postsaam tv

लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजातला आहे. तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय असून त्याची गँग देखील आहे. बिश्नोई समाजात हरीण, काळवीट आदी. प्राण्यांना फार महत्त्व असते. काळवीट प्रकरणावरुन त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता भोसले प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईची एन्ट्री झाल्याचे लोक म्हणत आहेत. पण या फेसबुक अकाउंटची सत्यता समोर आली नसल्याने ते अकाउंट बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Satish Bhosale Beed Crime
Rupali Patil : पुण्यात बड्या बापाच्या पोरांचं अश्लील वर्तन, किती निर्लज्ज आहे, रुपाली पाटील भडकल्या, पैशांचा एवढाच...

वन अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेच्या घरावर धाड टाकली. तपासामध्ये त्यांना वन्य प्राण्यांच्या मांस आढळले. हरीण, काळवीट, मोर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्या सुद्धा भोसलेच्या घरी अधिकाऱ्यांना मिळाल्या. शेतात हरणाची शिकार करण्यास मनाई केल्याने भोसलेने साथीदारांच्या मदतीने ढाकणे बापलेकांना मारहाण केल्याचे बावी गावचे ग्रामस्थांनी म्हटले होते.

Satish Bhosale Beed Crime
Santosh Deshmukh: संतोष देशमुखांच्या अंगावर तब्बल १५० जखमा, कोणत्या हत्याराने वार केले? फोटो आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com