Santosh Deshmukh: संतोष देशमुखांच्या अंगावर तब्बल १५० जखमा, कोणत्या हत्याराने वार केले? फोटो आले समोर

Santosh Deshmukh weapons CID investigation : संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी हत्यारं बनवली होती. सीआयडी दोषारोपत्रातून हत्याराचे फोटो समोर आल्या आहेत.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh CaseSaam Tv
Published On

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक बाबी समोर येत आहेत. सीआयडीनं न्यायालयासमोर सादर केलेल्या दोषारोपत्रातून देशमुख यांच्या क्रुर मारहाणीचे फोटो समोर आले होते. आता त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी नेमकं कोणत्या शस्त्रांचा वापर केला होता, याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी देशमुखांची हत्या करण्यासाठी हत्यारं बनवली होती आणि त्या शस्त्रांचे रेखाचित्र सीआयडीनं दोषारोपत्रात जोडले आहेत.

संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी हत्यारं बनवली होती. अशी माहिती सीआयडी दोषारोपत्रातून समोर आली आहे. ही सगळी हत्यारं सीआयडीच्या ताब्यात आहेत. यासाठी आरोपींनी गॅसचा पाईप, लोखंडी क्लच वायर पाईप, तसेच इतर तयार केलेल्या हत्यारांचा वापर केला होता.

Santosh Deshmukh Case
Pune News: रस्त्यावरच तरूणाचा नंगानाच, लंघुशंका करत मद्यधुंद अवस्थेत अश्लील चाळे; VIDEO व्हायरल

संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी ज्या हत्यारांचा वापर केला, ती हत्यारं सीआयडीनं ताब्यात घेतले आहेत. काही हत्यारे सुस्थितीत आहेत. तर, काही हत्यारांचे तुकडे झाले आहेत.

Santosh Deshmukh Case
Beed News: बीडमध्ये गुंडाराज सुरूच, लाथा-बुक्क्यांनी अन् रॉडनं मारहाण; रूग्णालयातही गुंडांची दहशत

या हत्यारांमध्ये ८० सेंटीमिटर लांबी अन् २.५० सेंमी रुंदीचा गॅस पाईप, अन् १०३ सेंटीमीटर लांबी, २ सेटींमिटर रुंदीचा क्लच वायर पाईपचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. या शस्त्रांची छायाचित्रे पाहून कुणाच्याही काळजाचा थरकाप उडेल.

मारहाणीचे फोटो समोर

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांना संताप अनावर झाला होता. नराधम संतोश देशमुख यांना विविध शस्त्रांचा वापर करून हल्ला करत होते. त्यांच्या प्रत्येक अवयवाला इजा झाली होती. त्यांचं शरीर काळं निळं पडलं होतं. शरीरात अडीच - तीन लिटर रक्त गोठलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com