Beed News: 'माझे हात-पाय तोडा, पण माझ्या लेकरांसाठी जिवंत सोडा', संतोष देशमुख करत होते विनवणी पण..

Shocking Details from Santosh Deshmukh Case Charge Sheet: आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार संतोष देशमुख यांना मारहाण करत होते. त्यावेळेस त्यांनी नराधमांसमोर विनंती केली होती. मात्र, तरीही त्यांच्यावर अत्याचार सुरूच होता.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh CaseSaam Tv
Published On

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक बाबी समोर येत आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आणि फोटो दोषारोपत्रातून समोर आल्यानंतर, लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली होती. अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

अशातच सीआयडीनं सादर केलेल्या दोषारोपत्रातून आणखी एक बाब समोर आली आहे. ज्यावेळेस आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार संतोष देशमुख यांना मारहाण करत होते, त्यावेळेस त्यांनी नराधमांसमोर एक विनवणी केली होती.

'माझे हात-पाय तोडा, पण माझ्या लेकरांसाठी जिवंत सोडा', अशी विनवणी त्यांनी केली होती. मात्र, तरीही दयामया न दाखवता संतोष देशमुख यांच्यावर निर्दयांकडून मारहाण सुरूच होती. यात त्यांचा मृत्यू झाला.

दिवंगत संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो पाहून कुणाचंही ह्रदय पिळवटून निघालं असेल. या घटनेला ९० दिवस उलटले. तरीही लोकांच्या मनामध्ये आग धगधगत आहे. या घटनेबाबत अनेक माहिती समोर येत आहेत. या घटनेचा सखोल तपास करत सीआयडीनं १४०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

Santosh Deshmukh Case
Crime: चारित्र्यावर संशय अन् नवऱ्याची सटकली, गर्भवती पत्नीचा गळा आवळला; नाशिक हादरलं

या फोटोमध्ये नराधम कशापद्धतीनं संतोष देशमुख यांना मारहाण करत आहेत, नराधमांनी क्रौर्याची परिसीमा कशी गाठली, हे दिसून येत आहे. काही नराधम देशमुखांना मारहाण करत असताना फोटो आणि व्हिडिओ शुट करत होते, तर काही सेल्फी काढत होते.

Santosh Deshmukh Case
Pune News: अंगावर आधी पेट्रोल ओतलं अन् ...पोलीस ठाण्यातच तरूणानं असं का केलं?

मारहाण करत असताना संतोष देशमुख यांनी नराधमांसमोर कळकळीनं विनवणी केली होती. आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार, प्रतीक घुले आणि जयराम चाटे जेव्हा संतोष देशमुख यांना मारहाण करत होते, त्यावेळेस त्यांनी या नराधमांसमोर 'माझे हात-पाय तोडा, पण माझ्या लेकरांसाठी जिवंत सोडा' अशी विनवणी केली होती. तरीही नराधमांच्या ह्रदयाला पाझर फुटलं नाही. ते विविध शस्त्रांचा वापर करून त्यांना मारत राहिले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती दोषारोपपत्रातून समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com