Pune News
Pune NewsSaam Tv News

Pune News: अंगावर आधी पेट्रोल ओतलं अन् ...पोलीस ठाण्यातच तरूणानं असं का केलं?

Man Attempts Self-Immolation in Police Station: एका तरूणानं पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला.
Published on

एका तरूणानं पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मारहाणीची तक्रार दाखल करूनही आरोपींवर गुन्हा दाखल होत नसल्यामुळे एकानं पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तरूणाचे प्राण वाचले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई केलीय.

पुण्यात एका तरूणानं पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील उरळी कांचन पोलिस ठाण्यात घडली आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरूणानं एका व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Pune News
Crime News: शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षांची गुंडगिरी, पोलीस पाटलांवर लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला

मात्र, तक्रार दाखल करूनही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं नव्हतं. तक्रार दाखल करूनही २४ तास उलटून गेले होते. पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात नव्हता. याच गोष्टीचा राग मनात धरून तरूणानं पोलीस ठाण्याच्या छतावर जात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Pune News
Bhayyaji Joshi: भैय्याजी जोशींचं वक्तव्य देशद्रोह; संजय राऊत संतापले, मुख्यमंत्र्यांकडे केली विशेष मागणी

तरूणानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरूण पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न करत असल्याचं पाहताच त्यांनी तरूणाकडे धाव घेतली. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून वेळीच हस्तक्षेप करत तरूणाचे प्राण वाचवले. यामुळे अनर्थ टळला. या प्रकारानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com