Sangli News Saam TV
महाराष्ट्र

Sangli News : हृदयद्रावक! वैरण आणायला गेले अन् काळाचा घाला; एकाचवेळी कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू

Electric Shock : तिघेही शेतात वैरण काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी चौघांना विजेचा बसला धक्का.

Ruchika Jadhav

सांगलीमध्ये मन सुन्न करणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एकाचवेळी घरातील ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकाच घरातील तीन जण अचानक या दुनियेतून निघून गेल्याने कुटुंबियांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. विजेच्या शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना मिरजेच्या म्हैसाळ येथील आहे. शेतात पडलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारेच स्पर्श त्यांचा मृत्यू झालाय. हे तिघेही शेतात वैरण काढण्यासाठी गेले होते त्यावेळी चौघांना विजेचा धक्का बसला. विजेचा झटका इतका जोरदार होता की यात ३ जणांचा मृत्यू झाला आणि १ जण जखमी आहे.

परिशनाथ मारुती वनमोरे (वय 40), साईराज वनमोरे (वय 13) आणि प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय 35)असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हेमंत पारिशनाथ वनमोरे (वय 14) असे जखमी मुलाचे नाव आहे. वनमोरे कुटुंबासोबत गेलेला कुत्रा देखील विजेचा शॉक लागून मृत पावला आहे.

जखमी मुलाला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पारिशनाथ वनमोरे मुलासोबत त्यांच्या शेतात चारा काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेतालगत असणाऱ्या सुभाष राजाराम पाटील यांच्या शेतामध्ये मुख्य विद्युत प्रवाह करणारी थ्री फेज विजेची तार तुटून पडली होती.

पारिश नाथ आणि साईराज यांना शॉक लागून ते जागीच ठार झाले. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला त्यांचा चुलत भाऊ प्रदीप आणि मुलगा हेमंत यालाही शॉक लागला. यात प्रदीप जागीच ठार झाले तर हेमंत गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती वनमोरे कुटुंबाला समजल्यानंतर वीज प्रवाह खंडित करून हेमंतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मालकांच्या मागे गेलेला कुत्र्याला शॉक लागल्याने कुत्राही जागीच ठार झाला आहे. नातेवाईकांनी वीज महावितरण कंपनीवर संताप व्यक्त करून संबंधित वीज महावितरण कंपनीवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT