PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

EPF Balance Check: प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगारातून दरमहा पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) कापला जातो. तो कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या आधारे मोजला जातो. ईपीएफ खात्यात जमा केलेले हे पैसे निवृत्तीनंतर एकरकमी मिळतात.
EPF Balance Check:
Employees can now check their PF balance easily even without using a UAN numberSaam Tv
Published On
Summary
  • UAN नंबर नसतानाही PF बॅलन्स तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  • EPFO च्या SMS आणि मिस्ड कॉल सेवेद्वारे बॅलन्स सहज मिळतो.

  • ऑनलाइन तपासणीसाठी मात्र UAN खूप महत्त्वाचा असतो.

प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या मूळ पगाराच्या १२% रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. ईपीएफ खात्यात पैसे जमा केल्याने निवृत्तीनंतर सुरक्षितता मिळते. हे पैसे सहसा निवृत्तीनंतर मिळतात, परंतु काही परिस्थितींमध्ये, तुम्ही ते निवृत्तीपूर्वीही काढू शकतात. तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा होत आहेत की नाही हे वेळोवेळी तपासणे महत्वाचे आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तर त्यातून मार्ग काढता येईल. पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला यूएएन नंबर आवश्यक असते. तुम्ही UAN नंबरशिवायही PF बॅलन्स चेक प्रक्रिया करू शकता.

UAN नंबरशिवाय तुमचा बॅलन्स कसा तपासायचा?

तुमचा UAN तुमच्या KYC शी जोडलेला असणे आवश्यक आहे. खालील स्टेप्सनं तुम्ही UAN नंबरशिवाय तुमचा बॅलन्स तपासून शकतात.

प्रथम तुम्हाला ७७३८२९९८९९ वर एसएमएस पाठवावा लागेल.

तुमचा एसएमएस EPFOHO UAN ENG या स्वरूपात असावा.

ज्या भाषेत तुम्हाला तुमचा बॅलन्स तपासायचा आहे, त्या भाषेचा कोड ENG च्या जागी लिहा.

हिंदी- (HIN)

पंजाबी- (PUN)

गुजरात- (GUJ)

मराठी- (MAR)

कानडी- (KAN)

तमिळ- (TAM)

मल्याळम- (MAL)

बंगाली- (BEN)

EPF Balance Check:
Farm Land: भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचं?

मिस्ड कॉल देऊन तुमचा बॅलन्स तपासा.

जर तुम्हाला तुमच्या एसएमएसमध्ये काही समस्या येत असतील किंवा प्रतिसाद मिळत नसेल, तर तुम्ही फोन नंबरवर मिस्ड कॉल देऊनही तुमची बॅलन्स तपासू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ९९६६०४४४२५ वर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

मिस्ड कॉल दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सशी संबंधित सर्व तपशीलांसह एक एसएमएस मिळेल.

यासाठी तुमचा UAN तुमच्या पॅन किंवा आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे. यासह तो सक्रिय असणे आवश्यक आहे

तुम्ही तुमच्या पगार स्लिपमधून तुमचा UAN नंबर देखील शोधू शकता. त्यानंतर तुम्ही अॅपद्वारे तुमचे पीएफ पासबुक डाउनलोड करू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वरून उमंग अॅप डाउनलोड करावे लागेल.

यानंतर तुम्हाला सेवांच्या यादीतून EPFO ​​निवडावे लागेल.

त्यानंतर कर्मचारी केंद्र सेवांमध्ये जा आणि पासबुक पहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com