School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

School Closed on 5th December in Maharashtra: राज्यातील सर्व शाळा येत्या ५ डिसेंबरला बंद राहण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक महामंडळाने संपाचा इशारा दिला आहे. अनेक मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे.
School Closed
School ClosedSaam Tv
Published On
Summary

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

येत्या ५ डिसेंबरला शाळा बंद राहण्याची शक्यता

मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा

शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यात येत्या ५ तारखेला सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळेत शिक्षक येणार नसल्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातील शाळा बंद राहतील.

School Closed
ST Mahamandal Bharti: १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! एसटी महामंडळात मिळणार नोकरी, आजच करा अर्ज

मुख्याध्यापक महामंडळाचा निर्णय (School Closed Decision)

पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचा निर्णय झाला आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी मोर्चा काढणार

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे.या मागण्या पूर्ण होत नसल्याचे संपाचा इशारा दिला आहे.

School Closed
Maharashtra TET: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार रविवारी; CCTV कॅमेरे,फिंगर प्रिंट स्कॅनिंग, बायोमेट्रिक परीक्षा केंद्रावर तगडी व्यवस्था

शिक्षकांच्या मागण्या काय?

राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये.१५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावे.शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी. या मागण्यांसाठी मुख्याध्यापक राजव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

टीईटी परीक्षा अनिवार्य करु नये, ही मुख्याध्यापक महामंडळाची मुख्य मागणी आहे. आता राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. जर टीईटी परीक्षा दिली नाही किंवा परीक्षा पास झाली नाही तर त्या शिक्षकांना काम करता येणार नाही. दरम्यान, आता ही परीक्षा सर्व शिक्षकांना देणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय रद्द व्हावा, यासाठीच संपाचा इशारा दिला आहे.

School Closed
TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com