Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२५, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणावर आज सुनावणी, राज्यातील थंडीला पुन्हा सुरूवात, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

आम्हाला नगरपालिका खुर्च्या तोडण्यासाठी नाही तर परिवर्तन करण्यासाठी हवी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेला टोला लगावलाय. बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरमध्ये आले होते. यावेळेस कुळगांव बदलापूर शहराच्या विकासासाठी पाठवलेला निधी मधल्या मध्ये कुठेही झिरपू नये म्हणून भाजपला साथ द्या आपल्या विकासाची जबाबदारी आमची असेल असं आश्वासन जाहीर सभेत दिलं. त्यांनी यावेळी MMRDAमधील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिका क्षेत्रासाठी गेल्या 10 वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच प्रत्येक घरात 24 तास पाणी देण्याचा मानसही बोलून दाखवला.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ निवडणूक तापली; शिक्षणावरून सेना–भाजपचा आरोप–प्रत्यारोपांचा जोर

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीस अवघे चार दिवस बाकी असताना प्रचारयुद्ध चांगलेच तापले आहे. सेना आणि भाजप यांच्यातील आरोप–प्रत्यारोपांची मालिका गुरुवारी आणखी तीव्र झाली.

गुरुवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांच्या सासऱ्यांनी आणि भाजपाचे राज्य उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी एक वक्तव्य केले.त्यांनी म्हटलं की, “तेजश्री करंजुले उच्चशिक्षित CA आहेत,त्यांची शैक्षणिक पात्रता पाहूनच देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिली. सातवी–आठवी शिकलेल्या महिला उमेदवाराकडे जर नगरपालिका दिली तर ती कारभार कसा पाहणार?”

DHULE राम खाडे हल्ला प्रकरणावरून सुरेश धस यांची नार्को टेस्ट करण्याची महबूब शेख यांची मागणी

राम खाडे हल्ला प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे, सुरेश धस यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी महबूब शेख यांनी केली आहे, राम खाडे यांच्यावर यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा हल्ले झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिल्यानंतर देखील आष्टी येथील पीआयने राम खाडे यांना सुरक्षेची गरज नसल्याचा रिपोर्ट कोणाच्या आदेशावरून दिला असा देखील प्रश्न महबूब शेख यांनी उपस्थित केला आहे.

डहाणू नगरपरिषद - डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात

भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची असलेली डहाणू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात केली आहे. डहाणू नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी दोनच उमेदवार रिंगणात असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची थेट लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र माच्छी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भरत राजपूत हे मागील काळात देखील नगराध्यक्ष राहिले असून त्यांच्या काळात डहाणूचा विकास खुंटला असून डहाणूत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने डहाणूची जनता आमच्या पाठीशी राहील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माछी यांनी व्यक्त केला आहे. तर मागील काळात आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर डहाणूची जनता आपल्या पाठीशी राहील असा विश्वास भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांच्याकडून व्यक्त करण्यात येतोय. डहाणू नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकी ही चुरशीची झाली असून भाजप विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने भाजपची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळतंय

मेहबूब शेख यांनी भाजपवर व राणे कुटुंबियांवर साधला निशाणा

निलेश राणे यांनी भाजप उमेदवारातर्फे पैसे वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर मेहबूब शेख यांनी भाजपवर व राणे कुटुंबियांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पार्टी पैशांचा किती माज करते हे राणेंनाच कळलं हे सर्वात मोठं समाधानकारक आहे, भाजपची निवडणूक पैसा आणि सत्तेच्या बळावर असल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे, तर उमेदवारांकडे पैसा द्यायचा आणि तो पैसा वाटायचा आणि हे राणेंच्या घरी कळलं, महाराष्ट्राला हे माहित आहे परंतु राणेंना हे कळलं हे जास्त सोयीची गोष्ट असल्याचं म्हणत महबूब शेख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आमदार सुनील शेळके यांची तळेगाव मध्ये प्रचार रॅली. रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिल्यामुळे मावळच्या तळेगाव दाभाडे मध्ये आमदार सुनील शेळके यांची प्रचार रॅली. या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सुरेश धोत्रे यासह अनेक नेते उपस्थित होते. या प्रचार रॅली गणपती चौकातून सुरू झाली असून स्टेशन चौक मार्गे राधाकृष्ण मंदिराजवळ संपन्न झाले. तळेगाव दाभाडे मध्ये 27 नगरसेवकांपैकी 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. फक्त नव उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने घड्याळ चिन्हावर आणि अपक्ष अशा नगरसेवकांच्या प्रचारासाठी सायंकाळी ही प्रचार रॅली काढण्यात आली. या रेलला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिसून आलाय. राहिल्या तीन दिवसात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे. दरम्यान जागोजागी महिलांनी औक्षण करून उमेदवारांना आणि आमदार सुनील शेळके यांना शुभेच्छा दिल्या...

भाजपा प्रदेश अध्यक्षांनी दोन तारखेपर्यंत युती टिकविण्याच्या केलेल्या वक्तव्यावर महबूब शेख यांची टीका

भाजपा प्रदेश अध्यक्ष यांनी सध्या महायुतीच्या घटक पक्षांच्या मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या वादा वरून दोन तारखेपर्यंत महायुती टिकवायची आहे असे वक्तव्य केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी भाजपाला या दोन पक्षाच्या कुबड्या नको असल्याचं म्हणत महायुतीतील इतर दोन पक्ष सत्तेला गोचीड प्रमाणे चिकटून असल्याच म्हणत शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com