ajit pawar, chiplun rain, kokan saam tv
महाराष्ट्र

Chiplun Rain Updates : चिपळूणला पूरस्थिती; अजित पवारांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, तात्काळ उपाययोजना सूचवल्या

Ajit Pawar News : चिपळूणचा पुर्वाअनुभव लक्षात घेता उपमुख्यमंत्र्यांनी उचलले तातडीचे पाऊल

Siddharth Latkar

Kokan Rain News : गेल्या दाेन दिवसांपासून कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (dcm ajit pawar) यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग (Ratnagiri Collector M. Devender Singh) यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. (Maharashtra News)

हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार शेखर निकम (mla shekhar nikam) हे देखिल उपस्थित होते.

वाशिष्ठीचे पाणी धोकापातळीपर्यंत वाढली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूरामुळे (floods) बाधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.

दोन वर्षापूर्वी वाशिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे (vashishti river flooded) चिपळूणमध्ये (chiplun) मोठी वित्तहानी झाली होती. त्यावेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहिती सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

SCROLL FOR NEXT