महाराष्ट्रात आज ५ दसरा मेळावे होणार आहेत.
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील आणि आरएसएसचा दसरा मेळावा होणार आहे.
उद्धव ठाकरेंंता दसरा मेळावा दादरच्या शिवतीर्थावर होणार आहे.
एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा गोरेगावमध्ये होणार आहे.
पंकजा मुंडे भगवानगडावर तर मनोज जरांगे नारायण गडावरून भाषण देणार आहेत.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला हिंदू धर्मामध्ये खूपच महत्व आहे. राज्यभरामध्ये दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दसऱ्याच्या दिवशी अनेक राजकीय पक्षाचे दसरा मेळावे असतात या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर या दसरा मेळाव्यांना खूपच महत्व असणार आहे. राज्यात अनेक राजकीय पक्षांचे ५ दसरा मेळावे असणार आहे. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून नेमक्या काय घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचे राहणार आहे.
राज्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चा होत आहे. अशामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्यानिमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याच्या देखील चर्चा होत आहेत. दसरा मेळाव्याला हे ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार की नाही याकडे सर्वजण लक्ष ठेवून आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा, शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा हे दोन दसरा मेळावे मुंबईत असणार आहे. आरएसएसचा दसरा मेळावा नागपूरमध्ये होणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवानगडावर तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा नारायणगडावर होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज दादर येथील शिवतीर्थ येथे होणार आहे. या मेळाव्याला सायंकाळी ५ वाजता सुरूवात होईल. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को एग्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. हा मेळावा सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. 'यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही…', अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केली आहे.
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला भगवानगडावरील दसरा मेळावा सध्या बीडच्या सावरगाव घाट राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत होत आहे. या मेळाव्याचे नेतृत्व भाजपा नेत्या पंकजा मुंडे करत आहेत. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरू होईल. आज पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीडमधील नारायणगडावर होणार आहे. नारायणगडावर मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आज होणार आहे. आरएसएसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला खूपच जास्त महत्त्व असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून शस्त्रपूजन केले जाते. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण होते. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील उपस्थित राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.