Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

Raj Thackeray And Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले.
Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?
Dasara MelavaSaam Tv
Published On

Summary -

  • दसरा मेळावा २०२५ मध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावर जोरात चर्चा होत आहे.

  • बाळासाहेब ठाकरेंच्या काळात राज-उद्धव व्यासपीठावर एकत्र दिसायचे.

  • राज ठाकरे दिसले तर ठाकरे सेनेच्या युतीला नवी नांदी मिळू शकते.

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीचं पुढं काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र ठाकरेसेनेच्या नेत्यानं केलेल्या सूचक विधानानं आता युतीच्या चर्चांना वेग आलाय. आता बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

ठाकरे गटाचा दसरा मेळावा अवघ्या दोन दिवसांवर आलाय आणि सीमोल्लंघनाच्या या मेळाव्यात ठाकरे बंधू 20 वर्षांपूर्वी घातलेल्या सीमा ओलांडून एकत्र येणार का ? कारण संजय राऊतांनी दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान-प्रदान होऊ शकतं असं सूचक विधान केलं आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने आम्हाला फरक पडत नाही, असं वक्तव्यच सत्ताधाऱी पक्षाच्या मंत्र्यांनी केलीय.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?
Maharashtra Politics : आगामी निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा डाव, निलंबित नेत्याची घरवापसी; ताकद वाढली

दरम्यान ठाकरेसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जंगी तयारी सुरु झालीय. एकेकाळी बाळासाहेब ठाकरें असताना मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसायचे. मात्र राज ठाकरेंनी वेगळा मार्ग निवडल्यानंतर ते दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दिसले नाही. अशातच यंदाच्या ठाकरेसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे व्यासपीठावर दिसले तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होईल, असचं म्हणायला हवं. त्यासोबत राज ठाकरेचं ठाकरेसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे दोन्ही भावांच्या राजकीय युतीची नवी नांदी असेल.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?
Maharashtra Politics: मीच बाळासाहेब ठाकरे" संदेश देताय का? – राऊतांचा शिंदेंना सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com