Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar on Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशामध्ये शरद पवार यांनी याबाबत मोठं विधान केलं.
Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar on Raj Thackeray Uddhav Thackeray Saam Tv News
Published On

Summary -

  • ठाकरे बंधू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे.

  • शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही.

  • मुंबई-ठाण्यात ठाकरे बंधूंच्या ताकदीमुळे मविआला फायदा होईल, असे पवारांनी स्पष्ट सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. सर्वात आधी मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची इच्छा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. पण त्यांच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल असे म्हटले जात होते. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून महाविकास आघाडीवर परिणाम होईल का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांनी स्पष्टचं सांगितले. त्यांनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबई ठाणे इथं ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल.'

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार? उद्धव ठाकरे यांनी बैठकीत शाखाप्रमुखांना काय सूचना दिल्या?

देवेंद्र फडणवीस यांच्या ९ कोटींच्या जाहिरातीवरून शरद पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे. त्यांनी सांगितले की, 'जाहिरातीचं प्रस्थ इतकं मी कधी पाहिलं नव्हतं. शिंदेंना त्यांना आनंद द्यायचा असेल. त्यावर मी काही बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतात हे पहिले. छत्रपती यांच्याकडे आशीर्वाद मागायचा अधिकार आहे. जनतेनं त्यांच्याकडे राज्य दिलं. राज्यात अनेक समस्या आहेत त्या समस्या त्यासाठी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रजेसाठी, शेतकऱ्यांसाठी केलेलं काम सगळ्यांना महिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे ही विनंती. शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी.'

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: अरे बाबांनो उठा! आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले! कोण जिंकलं आणि कोण हरलं? राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात नेमके काय? VIDEO

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, 'हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे. मला याची कॉपी मिळाली आहे. सामंजस्य राहावं एकीची वीण कायम रहावं हे सगळ्यांनाच वाटतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावं यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे हे घातक आहे. विखेंची समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत. मात्र बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल. राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावं लागेल. हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही.'

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar : राज्य सरकार एकाच जातीचे नाही, त्यांना प्रश्न सोडवायचे नसून...; शरद पवार स्पष्टच बोलले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com