मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? भाजप नवीन जबाबदारी देण्याच्या तयारीत

BJP President: भाजप अध्यक्षपदाची शर्यत रंगली असून नवी नावे चर्चेत. देवेंद्र फडणवीस आणि पुरुषोत्तम रूपाला यांची नावे आघाडीवर.
CM Devendra Fadnavis  File Pic
Devendra Fadnavissaam tv
Published On
Summary
  • भाजप अध्यक्षपदाची शर्यत रंगली असून नवी नावे चर्चेत.

  • देवेंद्र फडणवीस आणि पुरुषोत्तम रूपाला यांची नावे आघाडीवर.

  • बिहार निवडणुकीनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता.

  • संघ आणि नेतृत्वाचा विश्वास फडणवीस यांना मोठा फायदा.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जेपी नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाच्या कार्यकाळ काही दिवसांत पूर्ण होणार आहे. भाजपकडून नव्या अध्यक्षपदाची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पुढील काही दिवसांत भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहे. त्याआधीच पाच नावे चर्चेत आहेत. देवेंद्र फडणवीस, मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर यांची नावे आघाडीवर आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी सध्या भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त राज्यातील प्रदेक्षाध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजपकडून केंद्रीय अध्यक्षांची निवडणूक घेतली जाईल. लवकरच भाजप अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या विश्वासाला पात्र असणारा नेताच भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. शिवाय संघाकडूनही त्या नावावर शिक्कामोर्तब होणं महत्त्वाचं आहे.

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मोदी सरकारमधील दोन मोठ्या नावांचा गंभीरपणे विचार सुरू आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या नावाचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

CM Devendra Fadnavis  File Pic
'भाज्या चोरल्या, पैसेही लुटले'; भाजप नेत्यांवर दुकानदाराचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "संदेश देण्यात आला आहे, मात्र फडणवीस यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत अजून चर्चा सुरू आहे. त्यांच्या नावाचा भाजप अध्यक्षपदासाठी गांभीर्याने विचार होऊ शकतो. ते तरुण नेते असून, त्यांना संघाचा पाठिंबा आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास आहे." या सर्व घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

CM Devendra Fadnavis  File Pic
मौलानाचा खरा चेहरा समोर, तंत्र - मंत्राच्या नावाखाली महिलांचे शोषण, घटना सीसीटीव्हीत कैद

निवडणुका कधी होणार?

भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप यावर निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय भाजपने संभाव्य उमेदवारांची यादी देखील तयार केल्याचे वृत्त आहे. ज्याचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विचार केला जाईल. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com