'भाज्या चोरल्या, पैसेही लुटले'; भाजप नेत्यांवर दुकानदाराचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Vegetable Vendor Accuses BJP Workers: कानपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ. भाजप कार्यकर्त्यांनी भाजी विक्रेत्याच्या गाडीतून भाज्या उचलल्याचा आरोप.
Vegetable Vendor Accuses BJP Workers
Vegetable Vendor Accuses BJP WorkersSaam
Published On
Summary
  • कानपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ.

  • भाजप कार्यकर्त्यांनी भाजी विक्रेत्याच्या गाडीतून भाज्या उचलल्याचा आरोप.

  • भाज्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर फेकल्याचं सांगितलं जातं.

  • पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका भाजी विक्रेत्यानं भाजप कार्यकर्त्यांवर भाजीपाला चोरल्याचा आरोप केला आहे. प्रत्यक्षात कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यासाठी आले होते. यादरम्यान, दोन्ही गटात बराच वेळ गदारोळ झाला. यादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी एका गाडीतून भाज्या उचलल्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर फेकण्यास सुरूवात केली. भाजप कार्यकर्त्यांनी गाड्यातून पैसेही घेतल्याचा आरोप आहे. भाजी विक्रेत्यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

बिहारमध्ये इंडिया ब्लॉकच्या एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आला. त्यामुळे देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात निदर्शने केली. कानपूरमध्येही असाच प्रकार घडला.

Vegetable Vendor Accuses BJP Workers
बापाच्या हत्येचा बदला घेतला! आरोपी अन् त्याच्या आईला घरासमोरच संपवलं, १० वर्षीय चिमुकल्याचीही बोटं कापली

आज तकच्या वृत्तानुसार, ३१ ऑगस्ट रोजी भाजप कार्यकर्ते मेस्टम रोडवरील काँग्रेस कार्यलयाबाहेर निषेध करण्यासाठी पोहोचले होते. रिपोर्टनुसार, यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ गोंधळ झाला होता. कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Vegetable Vendor Accuses BJP Workers
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा मृत्यू; रिक्षा चालवताना घडला भीषण अपघात, २ प्रवाशांचेही निधन

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या भाजीपाल्याच्या गाडीतून भाज्या उचलल्या. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांवर फेकल्या. पोलिसांनी या गोंधळाबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. भाजी विक्रेते राजेश सांगतात, 'भांडणामुळे गाडीतील फळे आणि भाज्या वाया गेल्या आहेत. टिळक हॉलभोवती उभ्या असलेल्या इतर विक्रेत्यांचेही नुकसान झाले आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर भाज्या फेकल्या', सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Vegetable Vendor Accuses BJP Workers
सणासुदीचा काळ! एक तोळा सोन्याचा दर किती? वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com