
राज्यात गणेशोत्सव व गौरी आगमनानिमित्त सोनं-चांदी खरेदीला उधाण.
सोन्याच्या दरात मोठी वाढ; २४ कॅरेट १० ग्रॅम सोनं ₹१,०६,०९० वर.
२२ कॅरेट सोनं ₹९७,२५० तर १८ कॅरेट सोनं ₹७९,५७० प्रति १० ग्रॅम.
चांदीच्या दरातही उसळी; १ किलो चांदी ₹१,२६,१०० पर्यंत पोहोचली.
सणासुदीच्या खरेदीत सामान्यांना वाढलेल्या दराचा फटका.
Gold Price Today: राज्यात सणासुदीचं वातावरण आहे. घरोघरी गणराया विराजमान झाले आहेत. गौरीचं देखील आगमन झालं आहे. गौरीसाठी बरेच जण सोन्याचे दागिने खरेदी करतात. सणासुदीच्या दिवसांत सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या सोनं खरेदी करावं की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
आज २ सप्टेंबर. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे २१० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोनं २१० रूपयांनी वाढले आहे. खरेदीसाठी आपल्याला १,०६,०९० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं २,१०० रूपयांनी महागले आहे. १०० ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला १०,६०,९०० मोजावे लागतील. सोन्याच्या वाढत्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार एवढं मात्र नक्की.
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २०० रूपयांची वाढ झाली आहे. १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९७,२५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २००० रूपयांची वाढ झाली आह. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,७२,५०० रूपये मोजावे लागतील.
२४, २२ कॅरेटसह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १६० रूपयांची वाढ झाली आहे. १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ७९,५७० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १६०० रूपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला ७,९५,७०० रूपये मोजावे लागतील.
सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदीच्या दरात १२६ रूपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,२६,१०० रूपये मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.