CSMT स्थानकात मराठा आंदोलकांचा गोंधळ, रूळावर उतरून लोकल अडवली, VIDEO समोर

Maratha Reservation Protest: मराठा आरक्षण आंदोलनाचा आज चौथा दिवस सुरू आहे. आझाद मैदान आणि सीएसएमटीवर आंदोलकांनी ठिय्या मांडला. ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणांनी वातावरण दणाणलं.
Maratha Reservation Protest
Maratha Reservation ProtestSaam
Published On
Summary
  • मराठा आरक्षण आंदोलनाचा आज चौथा दिवस सुरू आहे.

  • आझाद मैदान आणि सीएसएमटीवर आंदोलकांनी ठिय्या मांडला.

  • ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणांनी वातावरण दणाणलं.

  • आंदोलक रेल्वे रूळावर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस. आझाद मैदानासह मुंबईतील विविध भागांत मराठा आंदोलकांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. 'एक मराठा लाख मराठा' आंदोलकांच्या अशा घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला. तर काही आंदोलक सीएसएमटी स्थानकावर तळ ठोकून बसले आहेत. यावेळी काहींनी सीएसएमटी स्थानकावरील रूळावर जाऊन ठिय्या मांडला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या ३ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. सीएसएमटी स्थानकावरही मराठा आंदोलक ठाण मांडून बसले आहेत. आज मराठा आंदोलकांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं.

Maratha Reservation Protest
मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं, मुंबईत जाता आलं नाही म्हणून टोकाचा निर्णय, बीडमध्ये हळहळ

आज मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर लोकलच्या केबिनमध्ये घुसून पोस्टर लावले. तसेच लोकलच्या लोको पायलटच्या केबिनमध्येही घुसले. त्यांनी एक मराठा लाक मराठेचे पोस्टर लावले. यावेळी रेल्वे रूळावर उतरून लोकल अडवली. मराठा आंदोलक बाजूला झाल्यानंतर लोकल सुटली होती.

Maratha Reservation Protest
हरिहर किल्ल्यावरून उतरताना तोल गेला, खोल दरीत पडला; युवकाचा जागीच मृत्यू

आंदोलनात सहभागी तरीही अभ्यास सुरू

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मागील चार दिवसापासून उपोषण सुरू आहे. पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आपला वेळ वाया न घालवता आंदोलन चालू असताना देखील या विद्यार्थ्यांकडून अभ्यास सुरू आहे. याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com