Dasara Melava 2024 : इतिहासात नाव करायचं असेल तर...; भर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना केलं मोठं आवाहन

uddhav thackeray Dasara Melava 2024 : भर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना मोठं आवाहन केलं. शिवसेना कोणाची, याचा निकाल लवकर जाहीर करण्याचं आवाहन ठाकरेंनी केलं.
भर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना केलं मोठं आवाहन
Dasara Melava 2024Saam tv
Published On

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचं, या प्रश्नावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटात सुप्रीम कोर्टात लढाई सुरु आहे. मागील दोन वर्षांपासून शिवसेनेच्या दोन्ही गटात लढाई सुरु आहे. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदे गटाकडे आहे. मात्र, ठाकरे गटाचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर अद्याप दावा आहे. याच लढाईवरुन उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोठं आवाहन केलं.

शिवसेना फुटीनंतर दोन्ही गटाचा वाद कोर्टात पोहोचला. दोन्ही गटाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. या प्रकरणाला दोन वर्ष उलटूनही निकाल लागलेला नाही. त्यातच आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. तरीही शिवसेना कुणाची, याचा निकाल लागलेला नाही. यावरून उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड मोठं आवाहन केलं.

भर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना केलं मोठं आवाहन
CM Eknath Shinde Speech: 'होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी', CM शिंदेंनी मैदान गाजवलं

उद्धव ठाकरे म्हणाले, 'डी वाय चंद्रचुडसाहेब निर्णय घ्या, लोकशाही वाचवा. चंद्रचूडसाहेब वेळ गेली नाही. तुम्हाला इतिहासात नाव करायचं असेल, तर योग्य निर्णय घ्या. तुम्ही बाहेर जे बोलता तोच निर्णय घ्या. ते आठ नोव्हेंबर रोजी निवृत्त होईल. तीन सरन्यायाधीशांची कारकीर्द संपुष्टात येईल. पण निकाल देऊ शकले नाहीत. महाराष्ट्राची लढाई सांगणारी ही लढाई आहे'.

'माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही तरी मी लढत आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी माझ्याबरोबर शपथ घ्या, असंही ठाकरे म्हणाले.

भर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना केलं मोठं आवाहन
Uddhav Thackeay Dasara Melava : 'मी श्वानप्रेमी, पण लांडग्यावर प्रेम करणारा नाही; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. 'बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या. जे झाले ते चांगलेच झाले. आनंद दिघेंनीही पहिल्यांदा अक्षय शिंदेला गोळी घातली असती. आई-बहिणीवर वार करतो. त्याला गोळ्या घातल्याच पाहिजे. अक्षय शिंदेला मारायलाच पाहिजे होतं. पण अक्षय शिंदेला गोळी का घातली? इतरांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला गोळी घातली असेल तर त्याचा उलगडा झाला पाहिजे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com