shinde group melava : ...हा एकनाथ शिंदे पुरून उरला; दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीवर घणाघात,VIDEO

shinde group Dasara melava : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.
CM Eknath Shinde Speech
Ladki Bahin Yojana Satara:Saamtv
Published On

मुंबई : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेचा समाचार मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरुन उरला आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार घणाघात केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

हिंदू बांधवांनो, माता भगिनींनो.. हे बाळासाहेब ठाकरे म्हटलं की, अंगावर रोमांच यायचा. आतचा काही लोकांना हिंदू म्हणायची लाज वाटते. आपल्याला स्वाभिमान आणि अभिमान वाटतो. बाळासाहेब सारख्या हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आला आहे.

हिऱ्यापोठी जन्माला आलेल्या गोरगोट्यांना लाज वाटतेय. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. म्हणून आझाद शिवसेनाचा आझाद मेळावा आहे.

टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरुन उरला आहे. एकनाथ शिंदेंनी दोन वर्ष ठासून पूर्ण केली. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही, पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदान आणि विचार सोडत नाही. म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो. म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे एकनाथ शिंदे जातो, तिकडे सर्वजण हसतमुखाने स्वागत करतात. हेच आपण कमावले. दोन वर्षांमध्ये अगदी कमी काळात आपले सरकार लाडके सरकार झाले. लाडक्या बहि‍णींचे लाडके सरकार आहे.

आपण उठाव का केला, हे सांगायची गरज आहे का? बाळासाहेबांनी सांगितलेले अन्यायाला लाथ मारा, पेटून वाटा.. अन्याय सहन करु नका.. त्यामुळे अन्याय होऊ लागला, तेव्हा आम्ही उठाव गेला. अन्यायाविरोधात लढण्यासाठी उठाव केला. उठाव केला नसता तर शिवसेनेचे खच्चीकरण झाले असते. सच्चा शिवसैनिकांचा अपमान झाला असता.

महाराष्ट्र अनेक वर्षे मागे रहिला असता. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. मविआ सरकार होतं, राज्या तिसऱ्या क्रमांकावर होतं. सहा महिन्यात राज्य पहिल्या क्रमांकावर आणलं. याचा अभिमान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com