Shocking: नातवाने पिचकारीने रंग उडवला, आजीला राग अनावर; थेट उकळत पाणी अंगावर ओतलं, अंगावर काटा आणणारा VIDEO

Nagpur News: नागपूरमध्ये आजीने आपल्या नातवाच्या अंगावर उकळतं पाणी फेकल्याची घटना घडली. या घटनेमध्ये चिमुकला ४५ टक्के भाजला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Shocking: नातवाने पिचकारीने रंग उडवला, आजीला राग अनावर; थेट उकळत पाणी अंगावर ओतलं, अंगावर काटा आणणारा VIDEO
NagpurSaam Tv
Published On

Summary -

  • नागपूरमध्ये होळीच्या दिवशी धक्कादायक घटना घडली

  • रंग उडवल्याच्या रागातून आजीने ४ वर्षांच्या नातवावर उकळते पाणी टाकले

  • या घटनेत चिमुकला ४५ टक्के भाजला

  • या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे

पराग ढोबळे, नागपूर

होळी उत्सवादरम्यान नागपूरमध्ये एक भयंकर घटना घडली. अंगावर रंग उडवल्याच्या रागातून आजीने आपल्या नातवाच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं. या घटनेत ४ वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कोराडीत हा संतापजनक प्रकार घडला. होळीच्या दिवशी अंगावर रंग उडवल्यामुळे संतप्त झालेल्या स्वत:च्या आजीने आपल्या चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतले. ही अमानुष घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेत ४ वर्षांचा ओम हरीश वांगे हा चिमुकला गंभीर जखमी झाला. सिंधू ठाकरे असं आजीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही फुजेटमध्ये दिसत आहे की, ओम घराबाहेर पिचकारीने रंग खेळत होता. यावेळी ओमची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत भरून घरी नेत होत्या. त्याठिकाणी ओम खेळत होता. खेळकरपणे तो त्याठिकाणी आला आणि त्याने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. आजीने रागाच्या भरामध्ये हातामध्ये असलेल्या बादलीतील उकळते पाणी थेट ओमच्या अंगावर ओतले. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने जोरजोरात रडू लागला.

Shocking: नातवाने पिचकारीने रंग उडवला, आजीला राग अनावर; थेट उकळत पाणी अंगावर ओतलं, अंगावर काटा आणणारा VIDEO
Shocking: कोल्हापूर हळहळलं! पोटच्या मुलासाठी २० वर्षे सोसल्या झळा, पण क्षणात सर्व संपलं; दुधाच्या पातेल्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

ओम आरडाओरडा करत असताना त्याच आजीने आपल्या नातीच्या हातामध्ये असलेली थंड पाण्याची बादली घेत ते पाणी ओमच्या अंगावर टाकते. या घटनेमध्ये ओम गंभीर भाजला गेला. ओमच्या कमरे खालच्या भागावर गंभीर जखमा झाल्या. कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. ओमचे वडील वेकोलीत कार्यरत आहे. या घटनेत ओम सुमारे ४५ टक्के भाजल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लिसानी व्हायरल सीसीटीव्हीच्या अनुषंगाने तपास करत आहेत.

Shocking: नातवाने पिचकारीने रंग उडवला, आजीला राग अनावर; थेट उकळत पाणी अंगावर ओतलं, अंगावर काटा आणणारा VIDEO
Shocking: पँट काढली, पाइल्स ऑपरेशनचे व्रण दाखवले; तरीही सुट्टी नाकरली, रेल्वेतील धक्कादायक प्रकार समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com