संजय गडदे, साम प्रतिनिधी
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहाताय? म्हाडाच्या माध्यमातून घराचं स्वप्न पूर्ण करताय? हो,तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीन अर्ज करत असाल तर सावधान. तुम्ही अर्ज करत असलेली लिंक ही खरी किंवा अधिकृत आहे का? तपासून घ्या.
सायबर ठग म्हडाच्या अर्जदाराना लक्ष्य करत आहेत. सायबर ठगांनी म्हाडाची एक बनावट वेबसाइट तायर केलीय. म्हाडाच्या वेबसाईटसारखीच खोटी वेबसाइट तयार केलीय. या वेबसाईटवरुन अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाईन जाहिरात करत ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढलं जात आहे. काही अर्जदारांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीजण गोरेगावचे घर दाखवत आहेत. त्यातील एक महिला घर पाहिजे तर ६ लाख भरा असं आवाहन करते.
त्यासाठी ठगांनी हुबेहूब म्हाडासारखे संकेतस्थळ बनवले आहे. फोटो, रंगसंगती सेम टू सेम आहेत. सदनिकेची पूर्ण किंमत २९ लाख सांगितली आहे. पूर्ण किंमत भरल्यावर ताबा भरला जाईल अशा भूलथापा मारल्या फसवणूक झाल्याचे लक्षात येताच म्हाडाकडे तक्रार करण्यात आलीय. म्हाडाच्या आयटी विभागाने यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार केली. हाती आलेल्या माहितीनुसार, बोगस वेबसाईट mhada.org अशी आहे. तर housing.mhada.gov.in ही खरी वेबसाईट आहे.
११ हजार घरांसाठी लॉटरी
मुंबई आणि कोकण विभागातील नागरिकांसाठी म्हाडाने मोठ्या प्रमाणावर घरांची जाहिरात काढली आहे. मुंबईत दोन हजारांसाठी तर कोकण मंडळाकडून तब्बल ९ हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आलीय. यामुळे मुंबईसह कोकण विभागातील तब्बल ११ हजार नागरिकांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात म्हाडाकडून यासंदर्भात जाहिरात काढण्यात येणार आहे. यासाठी ३० जुलैपासून अर्ज करता येणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यात सोडत काढण्यात येण्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.