Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल ९३.८३ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी; राज्यात कोकण विभाग अव्वल

Maharashtra SSC Board exam result: नेहमीप्रमाणे मुलींनीच राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Maharashtra SSC Result 2023
Maharashtra SSC Result 2023Saam TV
Published On

SSC Result Announce: इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. आज दहावीचा निकाल जाहीर झाला असून यावेळी देखील कोकण प्रथम क्रमांकावर आहे. तसेच नेहमीप्रमाणे मुलींनीच राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (Latets SSC Result)

दहावीचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. कोकण (Kokan) विभागाचा निकाल ९८.११ टक्के इतका असून हा सर्वाधिक निकाल (Result) आहे. तसेच यंदा दहावीच्या निकालात नागपूरची मुलं मागे पडलीयेत. नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. नागपूरमध्ये दहावीचा निकाल ९२.०५ इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तीन टक्क्यांनी घटला आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तिर्णतेचे प्रमाण ३.८२ टक्क्यांनी जास्त आहे.

Maharashtra SSC Result 2023
Mumbai Crime News: देवाला तरी सोडा रे...! गणेश मूर्तीची चोरी; काही तासांतच पोलिसांनी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

विभागीय निकाल

पुणे: ९५.६४ टक्के

नागपूर: ९२.०५ टक्के

औरंगाबाद: ९३.२३ टक्के

मुंबई: ९३.६६ टक्के

कोल्हापूर: ९६.७३ टक्के

अमरावती: ९३.२२ टक्के

नाशिक: ९२.२२ टक्के

लातूर: ९२.६७ टक्के

कोकण: ९८.११ टक्के

दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना आपला निकाल आज दूपारी १ वाजता पाहता येणार आहे.

कसा पाहाल निकाल?

>> सर्वात आधी www.mahresult.nic.in अधिकृत वेबसाइटवर जा.

>> दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

>> तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.

>> दहावीचा निकाल (SSC Result) तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Maharashtra SSC Result 2023
2 June Ki Roti: फार नशीबवान लोकांनाच मिळते २ जूनची चपाती; कारण जाणून व्हाल थक्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com