Ahilyanagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये सायबर पोलिसांची मोठी कारवाई, १२ 'म्युल अकाउंट्स'विरोधात गुन्हा; बँक खाते भाड्याने द्यायचे अन्...

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरममध्ये सायबर पोलिसांनी १२ 'म्युल अकाउंट्स'विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Priya More
  • अहिल्यानगर सायबर पोलिसांनी १२ म्युल अकाउंटधारकांविरोधात गुन्हा दाखल केला

  • सुमारे ४० लाखांच्या सायबर फसवणुकीचा तपास सुरू

  • फसवणुकीची रक्कम बँक खात्यात घेऊन एटीएम आणि धनादेशाद्वारे काढल्याचे उघड

  • नागरिकांनी बँक खाते भाड्याने देऊ नये असे पोलिसांचे आवाहन.

सुशील थोरात, अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी १२'म्युल अकाउंट्स'विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांची मोठी मोहीम राबवत बँक खाते भाड्याने देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. ऑनलाईन पद्धतीने ही फसवणूक केली जात होती. फसवणुकीची रक्कम स्वत:च्या बँक खात्यामध्ये स्वीकारून ती लगेचच एटीएम किंवा धनादेशाद्वारे काढणाऱ्या खातेधारकांसह मुख्य सायबर गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून फसवणूक करणारे गुन्हेगार अत्यंत संघटितपणे काम करत आहेत. सायबर पोलिसांनी १२ म्युल अकाऊंटच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये अहिल्यानगर शहर, संगमनेर, शिर्डी, राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यातील १२ जणांच्या बँक खात्यांवर फसवणुकीची रक्कम प्राप्त झाल्याचे पोलिस तपासातून उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हेगार हे सामान्य नागरिकांची बँक खाती काही पैशांचे किंवा कमिशनचे आमिष दाखवून भाड्याने घेतात आणि त्यामध्ये देशभरातील नागरिकांची फसवणूक केलेली रक्कम जमा करतात. अशा खात्यांना' म्युल अकाउंट्स' म्हटले जाते. अहिल्यानगरचे पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने अहिल्यानगर सायबर पोलिसांनी अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. 'महाराष्ट्र सायबर' यांच्या निर्देशानुसार नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली.

अहिल्यानगर सायबर पोलिस ठाण्यामध्ये अशा १२ बँक खातेधारकांवर आणि त्यांचे खाते आणि त्या खात्यांना हाताळणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये फसवणुकीची रक्कम सुमारे ४० लाख रुपयांहून अधिक स्वतःच्या फायद्यासाठी तत्काळ एटीएम किंवा चेकद्वारे काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू असून आणि संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. फसवणुकीची रक्कम स्वतःच्या खात्यात स्वीकारून ती काढून मुख्य गुन्हेगारांना मदत करणारे खातेधारक हे या सायबर गुन्ह्यात थेट 'सहआरोपी मानले जातात. आपले बँक खाते केवळ स्वतःच्या वैयक्तिक आणि फायदेशीर व्यवहारांसाठीच वापरा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

SCROLL FOR NEXT