Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Shreya Maskar

अहिल्यानगर

अहमदनगर किल्ला हा अहिल्यानगर (अहमदनगर) येथील छावणी (कॅन्टोन्मेंट) भागात वसलेला आहे. त्याचे प्रशासन भारतीय लष्कराच्या 'आर्मर्ड कॉर्प्स कोअर'द्वारे चालवले जाते.

Ahilyanagar | google

अहमदनगर किल्ला

अहमदनगर किल्ला ज्याला 'भुईकोट किल्ला' म्हणूनही ओळखले जाते. भिंगार नाल्याजवळ वसलेला हा किल्ला पुण्यापासून ईशान्येला सुमारे १२० किमी आणि औरंगाबादपासून ११४ किमी अंतरावर आहे.

Ahmednagar Fort | google

किल्ल्याचा आकार

अहमदनगर किल्ला हा 'भुईकोट' किल्ला आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण लंबवर्तुळाकार आकाराचा आहे. याचा परीघ सुमारे १.७ किलोमीटर असून, २२- २४ भव्य बुरूज आणि ३० मीटर रुंदीचा खोल खंदक यामुळे तो अत्यंत सुरक्षित आणि अभेद्य बनला आहे.

The size of the fort | google

किल्ला कोणी बांधला?

अहमदनगर किल्ला मूळतः १४९० मध्ये निजामशाही घराण्याचे संस्थापक मलिक अहमद निजाम शाह (पहिला) यांनी मातीचा किल्ला म्हणून बांधला होता.

Who built the fort? | google

इतिहास

हुसेन निजाम शाह यांच्या काळात १५५९ ते १५६३ दरम्यान याचे दगडी बांधकामाद्वारे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण आणि बळकटीकरण करण्यात आले, ज्यामुळे आजचा हा भव्य किल्ला अस्तित्वात आला.

History | google

सत्ता

शतकानुशतके या किल्ल्यावर मुघल, मराठे आणि ब्रिटिश यांसारख्या विविध सत्तांचे नियंत्रण राहिले. ब्रिटिश काळात हा किल्ला उच्च-सुरक्षेचे कारागृह म्हणून वापरला जात असे.

the power | google

कसं जाल?

अहमदनगर किल्ला हे अहमदनगर सल्तनतीचे राजकीय आणि लष्करी मुख्यालय होते. अहमदनगर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईहून अहमदनगरपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे तेथून तुम्ही रिक्षा किंवा बसने जाऊ शकता.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Goa Fort | saam tv
येथे क्लिक करा...